सातारा : खाजगी सावकारीतून होणार्या मानसिक, शारीरिक त्रासाबद्दल सांगलीकर बंगला, महाबळेश्वर येथील अनिकेत विठ्ठल ढेबे या युवकाने या प्रकरणात न्याय न मिळाल्यास कुटुंबासह आत्मदहनाचा इशारा दिला आहे. या प्रकारास सर्वस्वी पोलीस प्रशासन जबाबदार राहील, असेही त्यांनी प्रसार माध्यमांना पत्रकार परिषदेत सांगितले.
या प्रकरणातील खरे सूत्रधार चंद्रकांत धोंडीबा ढेबे, महादेव गोरे हे सातत्याने सावकारीतून घेतलेले पैसे माघारी कधी देणार, असे सांगून मला विनाकारण त्रास देत आहेत, अशी तक्रार ढेबे यांनी केली.
याबाबत अनिकेत ढेबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी 2023 मध्ये भावाच्या लग्नासाठी अनिकेत ढेबे यांनी चंद्रकांत ढेबे यांना एका पतसंस्थेतून कर्जाची मागणी केली होती. त्यावेळी कर्ज प्रकरणास उशीर लागेल, असे सांगून चंद्रकांत ढेबे यांनी त्यांना साडेतीन लाख रुपये मदत म्हणून दिले. मात्र मार्च महिन्यातच ढेबे व महादेव गोरे हे त्याच्या घरी जाऊन माझ्या पैशाचे काय झाले ? त्याचे व्याज मला दे, असे धमकाऊ लागले. वारंवार होणार्या त्रासामुळे अनिकेत याने उधार उसनवार करून दहा महिन्यांमध्ये त्यांचे सहा लाख रुपये व्याजासह फेडले.
दरम्यान त्रास देणार्या गोरे व ढेबे यांनी अनिकेत याच्या आई-वडिलांकडून कोर्या स्टॅम्पपेपरवर सह्या घेतल्या आणि आम्हाला आमचे पैसे व्याजासह परत दे. तू आम्हाला 42 लाख रुपये देणे आहे, असे सांगायला सुरुवात केली. तसेच ऑगस्ट महिन्यामध्ये अनिकेत त्याच्या दुचाकीवरून घरी जात असताना महाबळेश्वर चौकात या दोघांनी त्याला धमकी देऊन मारहाण केली. हे प्रकरण पोलिसांना सांगितले तर जड जाईल, अशीही धमकी दिली. व्याजासह सर्व रक्कम मी फेडली असूनही मला पैशासाठी वारंवार त्रास दिला जात आहे, अशी तक्रार अनिकेत ढेबे यांनी पत्रकारांकडे केली. पत्रकारांच्या मध्यस्थीने हे प्रकरण थेट पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या दालनात पोहोचले. पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेऊन तक्रारदार अनिकेत ढेबे याला ठोस कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा |
कराड परिसरातील 92 गुन्हेगार हद्दपार |
सातारा तालुक्यातून १२ इसम हद्दपार |
तडीपार सराईत दुचाकी चोरटा जेरबंद |
लिंगायत समाज हिंदू धर्माचा अविभाज्य घटक : खासदार अजित गोपछडे |
साहेबराव पवार यांचे विचार मार्गदर्शक : पृथ्वीराज चव्हाण |
शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी |
आदेशाचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
राहत्या घरातून एकजण बेपत्ता |
हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा |
सणांच्या पार्श्वभूमीवर 14 गुन्हेगार फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतून तात्पुरते हद्दपार |
आरोग्य योजनेत गैरप्रकार करणार्या हॉस्पिटलला धडा शिकवणार |
साहेबराव पवार यांचे विचार मार्गदर्शक : पृथ्वीराज चव्हाण |
शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी |
आदेशाचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
राहत्या घरातून एकजण बेपत्ता |
हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा |
सणांच्या पार्श्वभूमीवर 14 गुन्हेगार फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतून तात्पुरते हद्दपार |
आरोग्य योजनेत गैरप्रकार करणार्या हॉस्पिटलला धडा शिकवणार |
गॅलेक्सी संस्थेच्या कार्यक्षेत्र विस्तारास परवानगी |
सावलीत उद्या खेळ पैठणीचा कार्यक्रम |
कष्टकरी-उपेक्षितांच्या चळवळीसाठी डी. व्ही. पाटील यांचे योगदान मोलाचे |
झेडपीसमोर रस्त्यासाठी उपोषण |
शिर्डीत जुनी पेन्शन संघटनेचे १५ रोजी पेन्शन महाअधिवेशन |