शासकीय कार्यालयांत राष्ट्रपती-पंतप्रधानांच्या प्रतिमा लावा; भाजपचे अविनाश खर्शीकर यांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन; पोस्ट, महसूल कार्यालयांना प्रतिमा भेट

by Team Satara Today | published on : 02 September 2026


सातारा : सातारा जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यालयांमध्ये राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या अधिकृत प्रतिमा सन्मानपूर्वक लावण्यात याव्यात, अशी मागणी भाजप सातारा शहर मध्य मंडल अध्यक्ष अविनाश (राजेंद्र) विजय खर्शीकर यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केली.
जिल्ह्यातील काही कार्यालयांमध्ये राष्ट्रपती व पंतप्रधान यांच्या अधिकृत प्रतिमा नसल्याचे निदर्शनास आले आहे. शासकीय कार्यालयांमध्ये राजशिष्टाचाराचे पालन होणे आवश्यक असल्याने संबंधित कार्यालयांना याबाबत स्पष्ट सूचना देऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी खर्शीकर यांनी केली.
दरम्यान, भाजप पदाधिकार्‍यांनी प्रधान पोस्टमास्तर, सातारा जिल्हा कार्यालय तसेच महसूल मंडल अधिकारी कार्यालयात लावण्यासाठी राष्ट्रपती व पंतप्रधानांच्या अधिकृत प्रतिमा भेट दिल्या. यावेळी जिल्हा सरचिटणीस विकास गोसावी, वैशाली टंगसाळे, विक्रांत भोसले, प्रवीण शहाणे, महेंद्र कदम, रीना भणगे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जीएसटी बुडव्या परप्रांतीय भंगार व्यवसायिकांचा जावलीत सुळसुळाट?; प्रशासनाच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष
पुढील बातमी
‘नारीशक्ती'च्या 'महिला सुरक्षित तर समाज सुरक्षित’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; चार शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थिनींना स्वयंरक्षणाचे धडे; आत्मविश्वास, प्रतिकारक्षमता वाढविण्यावर भर

संबंधित बातम्या