लोकशाही रणांगणातील लढवय्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना 57 व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

by Team Satara Today | published on : 18 July 2026


सातारा : सातारा नगरपरिषदेच्या वतीने लोकशाही रणांगणातील लढवय्ये, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीवीर लहुजी वस्ताद यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी सातारा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष ऍड. डी. जी. बनकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) जिल्हाध्यक्ष अशोक बापू गायकवाड, नगरपालिका आर्थिक दुर्बल घटक सभापती संकेत साठे, नगरसेविका सावित्री बडेकर, अर्चना कांबळे तसेच सचिन कांबळे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांच्या सामाजिक, साहित्यिक व परिवर्तनवादी कार्याला आदरांजली वाहिली.

यावेळी मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य, सामाजिक समतेसाठीचा संघर्ष आणि सर्वसामान्यांच्या हक्कासाठी त्यांनी दिलेले योगदान आजही प्रेरणादायी असल्याचे सांगितले. त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

या अभिवादन कार्यक्रमास नगरपरिषदेचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दहिवडीत नगरपंचायतीच्या आरोग्य सभापतींचं घर फोडलं; ११ तोळे सोने, अर्धा किलो चांदीसह लाखोंची रोकड लंपास
पुढील बातमी
जिल्हयातील सामाजिक कार्यकर्त्यांचे आत्मक्लेश आंदोलन; सोनम वांगचूक यांना पाठिंबा देत पोलिसांच्या कारवाईबद्दल नाराजी

संबंधित बातम्या