08:44pm | Sep 18, 2024 |
सातारा : गेल्या अकरा दिवसापासून भक्तीच्या जल्लोषात रंगलेल्या ऐतिहासिक शाहू नगरीने तब्बल 17 तासांच्या मिरवणुकीनंतर आवडत्या गणरायाला पुढच्या वर्षी लवकर या, असा गजर करत भावपूर्ण निरोप दिला. सातारा जिल्ह्यात साडेतीन हजार मंडळे, तर सातारा शहरातील 206 मंडळांच्या गणरायाचे निर्विघ्नपणे विसर्जन करण्यात आले. पोलीस अधीक्षक समीर शेख आणि त्यांच्या टीमने परफेक्ट कामगिरी करत विसर्जन मिरवणूक फार काळ रेंगाळणार नाही, याची कसोशीने काळजी घेतली. सातारा पालिकेने लगेच निर्माण व मूर्ती संकलनाचे काम हाती घेतले.
मात्र डॉल्बीचा दणदणाट आणि लेझरच्या ऐवजी फोकस लाईट याचा अतिरेक झाल्यामुळे कुठेतरी नियमांना हरताळ फासला गेल्याची चर्चा गणेश भक्तांमध्ये होती. काही मंडळांच्या विसर्जन मिरवणुका अत्यंत देखण्या ठरल्या. येथील राजकमल मंडळांनी लाडक्या बहिणीचा देखावा तसेच महिलांचे संरक्षण या विषयांवर देखावे सादर करून सामाजिक जाणिवांची किनार ठेवली. संपूर्ण सातारा शहर डीजेच्या तालावर तब्बल अखंड सतरा तास जल्लोष करत होते. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सुद्धा रात्री उशिरा विसर्जन सोहळ्यामध्ये एन्ट्री करताच कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा जोश आला. डीजेच्या तालावर त्यांनी सुद्धा ठेका धरला. बाबाराजेंची ही एन्ट्री चर्चेचा विषय ठरली. मात्र दरवर्षी सातार्यातील विसर्जन मिरवणुकीचा आकर्षण बिंदू असलेले खासदार उदयनराजे भोसले मात्र या विसर्जन सोहळ्यात दिसले नाहीत.
गेल्या अनेक वर्षांपासून सातार्यातील सार्वजनिक गणेश मंडळांनी जपलेली डीजे मुक्त उत्सवाची परंपरा यंदा खंडित झाली. शहरातील बहुतांश गणेश मंडळांनी ध्वनी मर्यादेचे नियम धाब्यावर बसवून बाप्पांच्या धुमधडाक्यात विसर्जन मिरवणुका काढल्या. डीजे च्या आवाजाने सर्वसामान्य नागरिकांना कानठळ्यादेखील बसल्या. अखेर बुधवारी सकाळी 9:40 वाजता मानाच्या शंकर-पार्वती गणेशाचे विसर्जन करण्यात आले. यानंतर 17 तास रंगलेला बाप्पांचा उत्सव शांत झाला.
शहरातील बहुतांश मंडळांनी सकाळी लवकर गणेशमूर्ती मंडपाबाहेर काढल्या होत्या. त्यामुळे सकाळपासूनच चिमुरड्यांसह भक्तांची गर्दी शहरातील मुख्य रस्त्यांवर सुरू झाली होती. परंतु सायंकाळी सहा नंतर गणरायाच्या विसर्जन मिरवणुका सुरू झाल्या. राजवाडा, मोती चौक, देवी चौक, कमानी हौद, शेटे चौक, प्रतापगंज पेठ मार्गे मिरवणुका बुधवार नाक्यावरील कृत्रिम तळ्याकडे मार्गस्थ होत होत्या. शहरातील हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच गणेश मंडळांनी यंदा पारंपारिक वाद्यांची परंपरा जपली. मात्र बहुतांश मंडळांनी अशा वाद्यांना बगल देत डीजेच्या दणदणाटात मिरवणुका काढल्या. डीजे बरोबरच लेझर लाईटचा वापर देखील करण्यात आला. अनेक मंडळांनी ध्वनी मर्यादेचे उल्लंघन केले. डीजेच्या कर्णकर्कश आवाजाने व त्यावर वाजविलेल्या रिमिक्स गाण्यांनी मिरवणुका पाहण्यासाठी आलेल्या सर्वसामान्य नागरिकांना मात्र कानावर हात ठेवावे लागले. तरुणाई देखील हिंदी-मराठी गाण्यांवर बेभान होऊन थिरकताना दिसून आली.
एक-एक करत मिरवणुका राजपथावरून विसर्जन तळ्याकडे मार्गस्थ होत होत्या. रात्री बारा वाजता सर्व प्रकारची वाद्ये बंद झाली. मानाच्या शंकर-पार्वती गणेशाचे बुधवारी सकाळी 9.40 वाजता विसर्जन करून सातार्याचा मिरवणूक सोहळा शांत झाला. सातारा पालिकेच्या वतीने विसर्जनासाठी चार कृत्रिम तळ्यांची उभारणी तसेच घरगुती गणेश विसर्जनासाठी ठिकठिकाणी छोट्या हौदांची सुविधा प्रदान करण्यात आली होती. तसेच जलतरण तलावातही गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. बुधवार नाक्यावरील तळ्यात क्रेनच्या माध्यमातून मोठ्या गणेश मूर्ती विसर्जित करण्यात आल्या. विसर्जन मार्ग व तळ्यांवर पालिका व पोलीस प्रशासनाकडून दीडशे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. शिवाय विसर्जन मार्गावर कडेकोट पोलीस बंदोबस्त देखील तैनात होता. त्यामुळे तब्बल 17 तास चाललेला बाप्पांचा विसर्जन सोहळा निर्विघ्नपणे पार पडला.
पिंपोडे बु. व नांदवळ येथे मतदान जनजागृती |
आर्थिक लाभाच्या अमिषाने सुमारे चार लाखांची फसवणूक |
मारहाण प्रकरणी सहाजणांवर गुन्हा |
अवैध दारु विक्री प्रकरणी महिलेवर गुन्हा |
घरात घुसून मारहाण प्रकरणी चारजणांवर गुन्हा |
एकाच्या मृत्यू प्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
कराड उत्तरचा २५ वर्षाचा बॅंकलाॅग पाचच वर्षात संपवू : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस |
मुंढे च्या सरपंच, सदस्यांचा राष्ट्रीय कॉंग्रेसमध्ये प्रवेश |
७ नोव्हेबर; नवनिर्माणाचे स्वप्न पेरणारा दिवस ! |
पृथ्वीराज चव्हाण यांचा थेट भेटीवर जोर |
जयंत पाटील यांनी साताऱ्यात घेतला मतदारसंघनिहाय आढावा |
अमित कदम यांच्या शिवसंवाद यात्रेचा परळी मध्ये झंझावात |
कोरेगावात बेबंदशाही ; विरोधात 'स्टेटस' ठेवले म्हणून हात मोडेपर्यंत झोडपले |
राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणिकरण बंधनकारक : जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी |
कुरवली खुर्द वृध्दाश्रमातील वृद्धांनी केला शंभर टक्के मतदान करण्याचा संकल्प |
एकाच्या मृत्यू प्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
कराड उत्तरचा २५ वर्षाचा बॅंकलाॅग पाचच वर्षात संपवू : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस |
मुंढे च्या सरपंच, सदस्यांचा राष्ट्रीय कॉंग्रेसमध्ये प्रवेश |
७ नोव्हेबर; नवनिर्माणाचे स्वप्न पेरणारा दिवस ! |
पृथ्वीराज चव्हाण यांचा थेट भेटीवर जोर |
जयंत पाटील यांनी साताऱ्यात घेतला मतदारसंघनिहाय आढावा |
अमित कदम यांच्या शिवसंवाद यात्रेचा परळी मध्ये झंझावात |
कोरेगावात बेबंदशाही ; विरोधात 'स्टेटस' ठेवले म्हणून हात मोडेपर्यंत झोडपले |
राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणिकरण बंधनकारक : जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी |
कुरवली खुर्द वृध्दाश्रमातील वृद्धांनी केला शंभर टक्के मतदान करण्याचा संकल्प |
मनोज जरांगेंनी केला 'महायुती'चा करेक्ट कार्यक्रम : हेमंत पाटील |
शिरवळ येथे ७ लाख ८६ हजार रुपयांची बेकायदेशीर दारू जप्त |
कारमधून पाच लाखाचे दागिने चोरीस |
कारची कन्टेनरला धडक; एकाचा मृत्यू |
चौघांकडून युवकाला मारहाण |