लोणंद, उंब्रज आणि सातारा येथे तीन स्वतंत्र कारवायांमध्ये देशी दारूच्या तीस बाटल्या जप्त

by Team Satara Today | published on : 25 January 2026


सातारा  : लोणंद उंब्रज आणि सातारा तालुका येथील तीन स्वतंत्र कारवायांमध्ये पोलिसांनी देशी दारूच्या 30 बाटल्या जप्त करून 2480 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या निर्देशाप्रमाणे बेकायदेशीर दारू वाहतूक संदर्भातत सातारा जिल्हा पोलिसांना  कारवायांचे आदेश मिळाले होते .त्यानुसार लोणंद पोलिसांनी वाठार कॉलनी तालुका खंडाळा येथे चौकात टपरीच्या आडोशाला अमोल सुधाकर बोडरे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 180 ml च्या आठशे रुपये किमतीच्या दहा बाटल्या जप्त केल्या. दुसऱ्या कारवाईत उंब्रज पोलिसांनी चरेगाव तालुका कराड येथे आरोपीच्या राहत्या घराच्या बाजूस 960 रुपये किमतीच्या 180 मिलीच्या बारा बाटल्या जप्त केल्या या प्रकरणात राजू बबन सोनवणे याला महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 प्रमाणे नोटीस बजावण्यात आली आहे.

तिसऱ्या कारवाईत सातारा तालुका पोलिसांनी हमदाबाज  येथे निळ्या रंगाच्या टपरीच्या आडोशाला दारू विक्री करणाऱ्या जब्बार महबूब शेख याला ताब्यात घेऊन त्याला नोटीस बजावली त्याच्याकडून 720 रुपये किमतीच्या 180 मुलीच्या आठ बाटल्या जप्त करण्यात आले आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्यात मेडिकल कॉलेजसाठी प्राध्यापकांची भरती; प्रशासनाने मागविले करार तत्वावरचे प्रपाठक
पुढील बातमी
कोंडवे येथे एकाची गळफास घेऊन आत्महत्या

संबंधित बातम्या