08:12pm | Oct 01, 2024 |
सातारा : किरोली तालुका कोरेगाव येथील ग्रामस्थांनी जिल्हा मार्ग 33 येथील रेल्वे मार्गावर नाली क्रमांक 339 ही तीन मीटर रुंद व तीन मीटर उंच आहे. या नालीची उंची तात्काळ वाढवण्यात यावी. कारण ग्रामस्थांना वाहतुकीला अडथळा येत आहे. या संदर्भात रेल्वे प्रशासन यांनी तातडीने कार्यवाही करावी. अन्यथा तारगाव स्टेशन येथे रेल्वे रोको करण्यात येईल, असा इशारा किरोली ग्रामस्थांनी दिला आहे.
भाजप उपाध्यक्ष गणेश घोरपडे, किरोलीचे माजी सरपंच शिवाजी चव्हाण, भिकाजी चव्हाण, रामकृष्ण चव्हाण, श्रीकांत चव्हाण, युवराज जाधव, प्रज्वल चव्हाण इत्यादी ग्रामस्थांनी पत्रकार परिषद घेऊन आपली व्यथा मांडली. या ग्रामस्थांच्या मागणीला किरोलीच्या सरपंच रेखा चव्हाण तसेच उपसरपंच धनाजी चव्हाण यांचाही पाठिंबा आहे.
गणेश घोरपडे पत्रकारांशी बोलताना पुढे म्हणाले, रेल्वे बोगद्याची अर्थात नालीची उंची किमान पाच मीटर उंच करण्यात यावी. रेल्वे मार्गाच्या पलीकडे 500 एकर शेतजमिनी (यामध्ये बहुतकरुन ऊस उत्पादन घेतले जाते), गणेश मंदिर, गावाची स्मशानभूमी आणि इतर गावांना जोडणारा जवळचा मार्ग आहे. हा मार्ग एकंबे, अपशिंगे, पिंपरी, किरोली, फत्त्यापूर, कामेरी सातारा असा जोडलेला आहे.
या नालीमध्ये चार ते पाच फूट पाणी साठून राहत आहे. त्यामुळे तेथून जनावरेसुद्धा जाऊ शकत नाहीत. ग्रामस्थांच्या मागण्यांबाबत रेल्वे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. तसेच भविष्यात रस्त्याच्या रुंदीकरणास त्यामुळे अडचण होणार आहे. रेल्वे मार्गावरील ही नाली पाच मीटर उंच व सहा मीटर रुंद करण्यात यावी अशी गेल्या दहा वर्षापासून आमची मागणी आहे. पश्चिम रेल्वे प्रशासनाने या मागणीची तातडीने दखल घ्यावी अन्यथा तारगाव रेल्वे स्टेशन येथे रेल रोको करण्यात येईल, असा इशारा या पत्रकार परिषदेद्वारे किरोली ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे.
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
दुचाकीला कुत्रे आडवे आल्याने एकाचा मृत्यू |
जीवन प्राधिकरण कर्मचार्यांचे वेतन आयोगासाठी आंदोलन |
कॉंग्रेस पक्ष वाढीसह विधानसभेला हवे सुक्ष्म नियोजन |
वंचित आघाडीच्या वतीने 58 उमेदवारांच्या मुलाखती |
कॉंग्रेस पदाधिकार्याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे |
लहुजी शक्ती सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने |
उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात |
कंत्राटी 83 पात्र उमेदवारांची ग्रामसेवकपदी नियुक्ती |
झेडपीच्या ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
भरधाव कारच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार |
फलटणची कुरेशी टोळी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार |
कॉंग्रेस पदाधिकार्याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे |
लहुजी शक्ती सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने |
उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात |
कंत्राटी 83 पात्र उमेदवारांची ग्रामसेवकपदी नियुक्ती |
झेडपीच्या ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
भरधाव कारच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार |
फलटणची कुरेशी टोळी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार |
झेडपीच्या आरोग्य विभागात 243 जणांना नियुक्ती |
उद्या शासकीय विश्रामगृहामध्ये होणार 'वंचित' च्या मुलाखती |
राजधानी रास दांडियाचे उदंड महिलांच्या प्रतिसादात उद्घाटन |
राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र सातारा जिल्ह्यात |
खोटं बोलणार्या कॉंग्रेसला मतदारांनी हरवलं : विकास गोसावी |