चोरीचा प्रयत्न केल्या प्रकरणी चार जणांवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 15 June 2025


सातारा : एका कंपनीत चोरीचा प्रयत्न केल्या प्रकरणी चार जणांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 14 रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास लिंब खिंड, ता. सातारा गावच्या हद्दीतील साई बालाजी पॅकेजिंग कंपनीमधील 6 लाख 87 हजार रुपये किंमतीचे साहित्य चोरण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी वर्षा राज गोसावी, मेघा किरण मोरे, सोमवती घाडगे तिन्ही रा. सैदापूर सातारा आणि रिक्षा क्र. एमएच 11 सीजे 7777 वरील चालक (पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही) यांच्या विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात प्रशांत शामराव मस्के रा. धावडी, ता. सातारा यांनी फिर्याद दाखल केली आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार गायकवाड करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
एसटी अपघातात एकाचा मृत्यू
पुढील बातमी
जाचहाट प्रकरणी चार जणांवर गुन्हा

संबंधित बातम्या