पाटण विधानसभा मतदारसंघात 21 जनता दरबार; 63% अर्ज निकाली, पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी’ उपक्रमाला मोठा प्रतिसाद : ना. शंभूराज देसाई

by Team Satara Today | published on : 14 February 2026


सातारा  : पाटण विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना थेट न्याय मिळावा आणि प्रशासनाशी थेट संवाद साधता यावा यासाठी 2004 पासून सुरू केलेली ‘जनता दरबार’ ही संकल्पना आजही सातत्याने राबविली जात असल्याची माहिती आमदारांनी पत्रकार परिषदेत दिली. 2009 नंतरही हा उपक्रम खंड न पडता सुरू असून 1 जानेवारी 2025 ते 31 जानेवारी 2026 या कालावधीत एकूण 21 जनता दरबार घेण्यात आले. या जनता दरबारामध्ये 1081 अर्जांचा निपटारा करण्यात आला असून 409 प्रलंबित अर्जांची पूर्तता आदेश देण्यात आले आहेत अशी माहिती सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच पालकमंत्री आपल्या दारी या योजनेला तालुक्यात प्रचंड प्रतिसाद मिळाला असून 3408 नागरिकांच्या अर्जावर कार्यवाही करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जनता दरबार आणि पालकमंत्री आपल्या दारी या दोन अनोख्या योजनांचा गोषवारा स्पष्ट करताना शंभुराज देसाई पुढे म्हणाले या जनता दरबारांमधील अर्जांपैकी सुमारे 63 टक्के प्रकरणांवर सकारात्मक कार्यवाही पूर्ण झाली असून संबंधित अर्जदारांची कामे मार्गी लागली आहेत. 1081 अर्ज समाधानकारक पद्धतीने निकाली काढण्यात आले आहेत . सध्या 409 अर्ज प्रलंबित आहेत. अपुऱ्या कागदपत्रांमुळे प्रकरणे अडलेली असल्यास ती तत्काळ पूर्ण करून संबंधित विभागांनी निर्णय घ्यावेत, असे निर्देश मागील आठवड्यात जिल्हास्तरीय बैठकीत अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, सप्टेंबर 2025 पासून ‘पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. गेल्या पाच महिन्यांत 160 गावांमध्ये प्रत्यक्ष भेटी देण्यात आल्या. सुमारे 5086 अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 3408 हजार अर्जांवर कार्यवाही पूर्ण झाल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले


जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांनंतर मतदारसंघातील 15 माजी पंचायत समिती सदस्य, 6 माजी जिल्हा परिषद सदस्य, 2 पराभूत जिल्हा परिषद उमेदवार आणि 1 पराभूत पंचायत समिती उमेदवार अशा एकूण 19 पदाधिकाऱ्यांना पुढील कामकाजाबाबत 19 तारखेपर्यंत आपापल्या गटामध्ये आभार मिळावे पूर्ण करावेत तसेच 20 21 रोजी मी स्वतः पाटण विधानसभा मतदारसंघात मतदारांचे आभार मिळावे घेणार आहे .विजय मतदारांचे विजय उत्सव साजरा न करता देसाई गट तातडीने जनतेच्या समस्यांच्या निपटाऱ्यासाठी कामाला लागला आहे .तसेच पाटण तालुक्यातील अतिवृष्टी ग्रस्त गावातील सात पैकी सहा ठिकाणी पुनर्वसनाची कामे सुरू आहेत असे देसाई यांनी सांगितले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
भारतीय जनता पार्टीचे नेते जे बोलतात ते करत नाहीत - शिवसेना राष्ट्रवादी एकत्र असल्याचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा निर्वाळा
पुढील बातमी
शाहू चौकात इंजेक्शनची अवैध विक्री उघड; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; १.५४ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक

संबंधित बातम्या