विनोद कुलकर्णी यांचा पत्रकारांच्यावतीने सत्कार

बीएनएस कायद्याच्या कार्यशाळेचे रविवारी आयोजन

by Team Satara Today | published on : 18 April 2025


सातारा : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कोषाध्यक्षपदी वरिष्ठ पत्रकार विनोद कुलकर्णी यांची निवड झाल्याने सातार्‍यातील पत्रकारांच्यावतीने रविवारी दि. 20 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथे जाहीर सत्कार केला जाणार आहे. तसेच बीएनएसया नवीन कायद्याचे मार्गदर्शन या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

 

सातारा पत्रकार संघ, सातारा तालुका पत्रकार संघ, डिजिटल मीडीया व छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा यांच्या संयुक्तविद्यमाने सत्कार सोहळा व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

 

वरिष्ठ पत्रकार विनोद कुलकर्णी यांनी पत्रकारितेसोबत, बँकींग, सहकार व साहित्य क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. साहित्य क्षेत्रातील त्यांचे योगदान पाहून साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च असलेल्या संस्थेच्या अखिल भारतीय साहित्य महामंडाळाच्या कोषाध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली. त्यांची ही निवड सातारच्या पत्रकारितेचा हा गौरव आहे. महाराष्ट्र शासनाच्या पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरिष पाटणे यांच्या हस्ते सातारा पत्रकार संघ, सातारा तालुका पत्रकार संघ, डिजिटल मीडीया परिषद यांच्यावतीने विनोद कुलकर्णी यांचा जाहीर सत्कार होणार आहे.

 

सातारा पत्रकार संघ कार्यान्वित झाल्यानंतर कार्यशाळा आयोजन करण्याची ही दुसरी वेळ आहे. भारत देशाने आयपीसी रद्द करुन भारतीय न्याय संहिता अर्थात बीएनएस या कायद्याची अंमलबजावणी केली आहे. याच बदलेल्या कायद्याची माहिती निवृत्त पोलिस अधिकारी अ‍ॅड. संभाजी पाटील देणार आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र शासनाच्या पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरिष पाटणे राहणार आहेत.

 

रविवारी होणार्‍या कार्यक्रमासाठी सातार्‍यातील पत्रकार बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विठ्ठल हेंद्रे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर भोईटे, उपाध्यक्ष उमेश बांबरे, सातारा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अजय कदम, कार्याध्यक्ष बाळू मोरे, उपाध्यक्ष विजय जाधव, सुनील साबळे, डिजिटल मीडियाचे शहर अध्यक्ष प्रतीक भद्रे, कार्याध्यक्ष गुरुनाथ जाधव, उपाध्यक्ष साई सावंत तसेच सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी केले आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत सातारच्या समृद्धी व यश यांची निवड
पुढील बातमी
खोडद येथे अवैध दारु प्रकरणी कारवाई

संबंधित बातम्या