सातारा : हिंदू धर्मियांच्या आराध्य दैवताबाबत वादग्रस्त आक्षेपार्ह आणि अपमान जनक वक्तव्य केल्याबद्दल ज्ञानेश महाराव याला ताबडतोब अटक अटक करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीतर्फे आज पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे करण्यात आली.
समस्त हिंदु धर्मियांचे आराध्य दैवत असलेल्या प्रभु श्रीराम व लक्ष्मण, सीतामाता व उर्मिलामाता तसेच श्री स्वामी समर्थ यांच्या बद्दल वादग्रस्त, आक्षेपार्ह व अपमानकारक वक्तव्य करून हिंदु धर्मियाच्या धार्मिक श्रद्धांचा दुष्ट हेतुने जाणीवपूर्वक अपमान करून समस्त हिंदु धर्माच्या धार्मिक भावना दुरावल्या तसेच ज्ञानेश महाराव याने जाणिवपूर्वक धोबी, परीट समाजाबददल समाजामध्ये व्देषाची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल ज्ञानेश महाराव याला ताबडतोब अटक करावी, अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष विकास गोसावी, भाजपा महिला मोर्चा प्रदेश चिटणीस सूनिशा शहा यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
ज्या कार्यक्रमांमध्ये ज्ञानेश महाराव याने हे वादग्रस्त आणि हिंदू धर्मियांच्या देवतांच्या बाबतीत अपमानजनक वक्तव्य केले, त्या कार्यक्रमाला उपस्थित असूनही खा. शरद पवार आणि खा. शाहूमहाराज छत्रपती यांनी हिंदू धर्मातल्या देवतांच्या बद्दल इतके अपमान जनक वक्तव्य ऐकूनही कोणतीही दखल न घेतल्याबद्दल आणि कोणताही आक्षेप न नोंदवल्याबद्दल त्यांचाही यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला.
याबाबतीमध्ये एफ आय आर दाखल करावी, अशी भाजपाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मागणी होती. परंतु एका ठिकाणी एफ आय आर दाखल झाल्यानंतर दुसर्या ठिकाणी करता येणार नाही, असे पोलीस प्रशासनाने सांगितले. त्यामुळे ज्ञानेश महाराव ला ताबडतोब अटक करावी आणि त्याच्यावर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन देण्यात आले.
यावेळी सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, महिला मोर्चा प्रदेश चिटणीस सूनीशा शहा, जिल्हा उपाध्यक्ष रवी आपटे, सातारा शहर सरचिटणीस प्रवीण शहाणे, महिला मोर्चा सातारा शहर अध्यक्ष रीना भणगे, सातारा शहर चिटणीस कीर्ती पोळ, युवा मोर्चाचे सुनील लाड, विजय कृष्णा गाडवे विश्व हिंदू परिषद जिल्हा अध्यक्ष, विक्रांत विभुते बजरंग दल जिल्हा संयोजक, विजय गुरव, अभिजित तांबे, सुरज माने, विशाल गोळे आदी पदाधिकारी- कार्यकर्ते उपस्थित होते.
ज्ञानेश महाराव यांना अटक करा : भाजपची मागणी
अन्यथा जनआंदोलन उभारू; निवेदनाद्वारे दिला इशारा
by Team Satara Today | published on : 10 September 2024

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा