साताऱ्यात नवीन आधार सेवा केंद्र कार्यान्वित; नागरिकांना जलद सेवा मिळण्यास मदत - निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील

by Team Satara Today | published on : 12 August 2026


सातारा : नव्याने सुरु झालेला आधार सेवा केंद्र रहिवाशांना जलद, अधिक सोयीस्कर आणि पारदर्शक आधार सेवा सुनिश्चित करेल. डिजिटल इंडियाचे स्वप्न साकार करण्याच्या आणि आपल्या राष्ट्रीय विस्ताराच्या दिशेने हे आणखी एक महत्त्वाचे पाऊल आहे, असे प्रतिपादन निवासी उपजिलहाधिकारी नागेश पाटील यांनी केले.  

वाय. सी. कॉलेजसमोर, सदर बाजार, सातारा या ठिकाणी नवीन आधार सेवा केंद्र सुरु झाले आहे. याचे उद्घाटन निवासी उपजिलहाधिकारी श्री. पाटील यांच्या हस्ते झाले, या प्रसंगी युआयडीएआय प्रादेशिक कार्यालय मुंबईचे सहाय्यक व्यवस्थापक मनोज प्रजापती आणि सेवा प्रदाता संस्था मेसर्स बीएलएस इंटरनॅशनलचे  वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

नव्याने सुरु करण्यात आलेले केंद्र आठवड्याचे ७ दिवस सुरु राहील. येथे नवीन आधार नोंदणी, ५ ते १७ वर्षे वयोगटातील मुलांसाठी मोफत बायोमेट्रिक अपडेट, लोकसंख्याशास्त्रीय (डेमॉग्राफिक) तपशीलांमधील दुरुस्ती आणि तक्रार निवारण सुविधा उपलब्ध  आहेत तरी नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असेही आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
स्वातंत्र्यदिनी साताऱ्यात रानभाजी महोत्सवाचे आयोजन; पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते होणार उद्घाटन
पुढील बातमी
दिव्यांगांसाठीच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा – पालकमंत्री शंभूराज देसाई; दिव्यांग बांधवाच्या अडीअचणी सोडविण्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक

संबंधित बातम्या