सातारा : महिलेशी असभ्य भाषेत बोलल्या प्रकरणी एकावर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 14 रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास सातारा तालुक्यातील एका गावात एका महिलेस असभ्य भाषेत बोलल्या प्रकरणी जगदीश पोपट काजळे (रा. तुकाईवाडी, ता. सातारा) याच्या विरोधात बोरगाव पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक कचरे करीत आहेत.