सातारा : सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी सहाजणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहर पोलीस ठाण्याच्या आवारात पोलिसांच्या समक्ष आरडाओरडा करून भांडण करून शांततेचा भंग केल्याप्रकरणी सहाजणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरयु धन्यकुमार माने, धन्यकुमार गोरख माने (दोघे रा. संगम माहुली), अनुराधा विशाल लोहार (रा. आंबेवाडी, ता. जि. सातारा), काजल नितीन गुजर (रा. यादोगोपाळ पेठ, सातारा), सुचिता तुषार सावंत (रा. अंबवडे, ता. सातारा) व स्वप्ना प्रताप कदम (रा. अमरलक्ष्मी, कोडोली, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. कॉन्स्टेबल प्राजक्ता ढेकळे यांनी फिर्याद दिली.
सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी सहाजणांवर गुन्हा
by Team Satara Today | published on : 21 February 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
रिक्षाचालकांवर वाहतूक शाखेची नजर; लवकरच विशेष तपासणी मोहीम
August 08, 2026
आजारपणाला कंटाळून शाहूपुरीत एकाची आत्महत्या
August 08, 2026