सातारा : विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 5 मे ते 19 सप्टेंबर दरम्यान नेहा चेतन निकम या विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पती राजाराम बाळकृष्ण जाधव, इंदू राजाराम जाधव, दुर्योधन चव्हाण, चव्हाण यांची पत्नी व मुलगा यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस हवालदार खाडे करीत आहेत.