कराडमध्ये किराणा दुकानाला भीषण आग; २० लाखांचे नुकसान

by Team Satara Today | published on : 25 June 2025


कराड : कराड येथील विजय दिवस चौक परिसरातील एका किराणामालाच्या दुकानाला सोमवारी रात्री दीडच्या सुमारास भीषण आग लागून सुमारे २० लाखांचे नुकसान झाले. अग्निशमन दलाने तब्बल दोन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली.

घटनास्थळ व अग्निशमन दलाकडून मिळालेली माहिती अशी की, कराड येथील विजय दिवस चौक परिसरात समीर खान यांचे यादगार ट्रेडर्स हे किराणामालाचे दुकान होते. सोमवार मध्यरात्री दीडच्या सुमारास दुकानातील साहित्याला अचानक आग लागली. आगीमुळे धुराचे लोट हवेत पसरू लागल्यानंतर आग लागल्याचे नागरिकांच्या लक्षात आले.

नागरिकांनी संबंधित दुकानाचे मालक आणि अग्निशमन दलाला तत्काळ त्याची माहिती दिली. अग्निशमन दलाचे प्रमुख श्रीकांत देवघरे हे तातडीने अग्निशमन बंब घेऊन कर्मचाऱ्यांसह दाखल झाले. त्यांनी सुमारे दोन तास प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. त्यासाठी अग्निशमन दलातील दादासाहेब जाधव, अमित थोरवडे, गणेश शेजवळ, सुभाष लोखंडे, योगेश पवार यांनी प्रयत्न केले. आगीत सुमारे २० लाखांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वेण्णा, उरमोडी, नीरा नद्यांना पूर
पुढील बातमी
मुलीच्या प्रेमविवाहामुळे आईने संपवले जीवन

संबंधित बातम्या