सातारा : कडधान्य पिकांच्या मूल्यवर्धनास चालना देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे या उद्देशाने काढणीनंतरची पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी कडधान्य प्रक्रिया युनिट (Processing Unit) स्थापन करण्यास आर्थिक सहाय्य प्रदान करणे. सदर योजनेअंतर्गत शेतकरी उत्पादक संस्था, क्लस्टर स्तर महासंघ, प्राथमिक कृषी पतसंस्था, उद्योजक तसेच प्रक्रिया युनिट स्थापन करण्यास इच्छुक इतर पात्र व्यक्ती, संस्था यांना सहाय्य देऊन कडधान्य मूल्यसाखळी अधिक कार्यक्षम व सक्षम करणे हा मुख्य उद्देश आहे. तरी इच्छुक पात्र व्यक्ती व संस्थांनी लाभासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिलहा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी केले आहे.
योजनेअंतर्गत पुढील घटकांना आर्थिक सहाय्य देण्यात येईलः शेतकरी उत्पादक संस्था, क्लस्टर स्तर महासंघ, प्राथमिक कृषी पतसंस्था व वैयक्तिक अर्जदार.
गट लाभार्थी संबंधित संस्था किमान मागील दोन वर्षांपासून विधिवत नोंदणीकृत व कार्यरत असावी.प्रकल्प खर्चाच्या किमान १५% रक्कम तसेच कार्यभांडवलासाठी आवश्यक मार्जिन मनी स्वतः उभारण्याची आर्थिकक्षमता असावी, असे पात्रतेचे निकष आहेत. अधिक माहितीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, सातारा व तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.