सातारा : शहरातील ज्वेलर्स व्यावसायिक असलेले श्रीकांत प्रमोद टंगसाळे (वय ३० रा. शुक्रवार पेठ, सातारा) यांची जावली तालुक्यातील भालेघर येथील दोन जणांनी तब्बल ५९ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक केली आहे.
याप्रकरणी अविनाश गणपत भिलारे आणि गणपत दगडू भिलारे (दोघे रा. भालेघर ता. जावली,जि. सातारा) यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भिलारे यांनी मौजे भालेघर, ता. महाबळेश्वर येथील गट नंबर ९२ मधील एक एकर जमीन विकत देतो असे ज्वेलर्स व्यावसायिक श्रीकांत टंगसाळे यांना सांगून त्यांच्याकडून वेळोवेळी ५९ लाख ७५ हजार रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली आहे. ही घटना १० फेब्रुवारी २०२३ ते ४ मार्च २०२६ च्या दरम्यान घडली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक राठोड करत आहेत.