सातारा : फॉरेस्ट कॉलनी परिसरात चेन स्नॅचिंग केल्याप्रकरणी अज्ञाता विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 27 रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास लता वसंतराव टकले (रा. विलासपूर सातारा) या वृद्धा फॉरेस्ट कॉलनी व गणेश नगर यांना जोडणाऱ्या लहान पुलावरून जात असताना दोन अज्ञातांनी त्यांच्या गळ्यातील पाच ग्रॅम वजनाचे व 25 हजार रुपये किंमतीची एकसर गळ्यातून हिसकावून घेऊन गेले आहेत. याबाबतची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक इंगळे करीत आहेत.
फॉरेस्ट कॉलनी परिसरात चेन स्नॅचिंग; अज्ञाता विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
by Team Satara Today | published on : 28 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा