अहमदाबाद : गुरुवारी (12 जून) दुपारी अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे प्रवासी विमान बोईंग ड्रीमलाइनर 787 क्रॅश झाले. या विमानात 242 प्रवासी होते, या घटनेचे धक्कादायक व्हिडीओ देखील पुढे येत आहेत. विमान सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनला जात असताना ही दुर्घटना घडली. या विमानात प्रवास करत असलेल्यांची नावे अजून पुढे आले नसून बचावकार्य राबवले जात आहे. विमानाचे अवशेष मेघानीनगर परिसरात आढळले आहेत. आग आणि धुरांचा लोट दूरपर्यंत दिसत आहे.
विमानाने सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केले होते. या अपघातात जखमी झालेल्यांना सरकारी रूग्णालयात दाखल केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर रूग्णालयातील डॉक्टरांच्या सुट्टया रद्द करण्यात आल्याचीही माहिती मिळत आहे. तात्काळ रूग्णालयात पोहोचण्याचे आदेश लागू करण्यात आली आहेत. सरकारी रूग्णालयात एकच धावपळ सुरू असल्याचेही एक चित्र बघायला मिळतं.
कर्मचारी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, आग अजूनही विझलेली नाहीये. विमान टेकऑफ झाल्यानंतर काही मिनिटात हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. या अपघातानंतर विमानाचा जवळपास संपूर्ण भाग जळाला आहे. हेच नाही तर विमान ज्या इमारतीवर धडके, त्या इमारतीचेही मोठे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान अहमदाबादहून लंडनकडे जात होते.
विमानात 242 प्रवासी असल्याचीही माहिती मिळत आहे. अपघातानंतर एक भीतीचे वातावरण परिसरात बघायला मिळत आहे. मात्र, हा अपघात नेमका कसा झाला, याबद्दलची माहिती ही अजून मिळू शकली नाहीये. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. जखमींना रूग्णालयात दाखल केले जात आहे. उडाण घेतल्यानंतर १० मिनिटांमध्ये हा अपघात झाल्याचेही कळत आहे. सोशल मीडियावर या अपघात अपघाताचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल होताना दिसत आहेत.