मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील तीनही प्रमुख पक्षांच्या पदरी मोठा निराशा आली. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला तर अवघ्या १० जागांवर समाधान मानावे लागले. या अपयशानंतर आता शरद पवारांचा पक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी एकत्र येणार का, याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे. अशातच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची मुंबईत दोन दिवसीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. या आढावा बैठकीच्या पहिल्या दिवसी काल पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे काहीसे आक्रमक झालेले पाहायला मिळाले. निवडणूक निकालानंतर काही नेते आणि पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पक्षातील नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांना पुष्पगुच्छ दिल्याने कार्यकर्ते आणि जनतेत संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. यावरून पाटील यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे.
विधानसभा निवडणुकीत झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मनोबलावरही परिणाम झालेला असू शकतो. त्यातच महत्त्वाचे नेतेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी जवळीक साधत असतील तर लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होणं अटळ आहे. बैठकीत पहिल्या रांगेत बसलेले काही नेतेच तिकडे पुष्पगुच्छ घेऊन गेले, असं म्हणत जयंत पाटील यांनी संबंधितांना सुनावल्याचे कळते.
जयंत पाटील हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या चर्चा अनेकदा रंगत असतात. पाटील यांच्यासाठी अजित पवारांनी एक मंत्रिपद रिक्त ठेवल्याचे सांगितले जाते. याबाबत सातत्याने होणाऱ्या चर्चांवर जयंत पाटलांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत खुलासा केला. मी कुठेही जाणार नाही, जायचं असतं तर यापूर्वीच गेलो असतो, असं पाटील यांनी म्हटल्याची माहिती आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आळस झटकून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीला लागण्याच्या सूचनाही जयंत पाटील यांनी दिल्या आहेत.
सातारा बसस्थानक परिसरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण |
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहराजवळ जमिनीच्या वादातून फायरिंग |
मराठी विश्वकोशाचे ट्विटरवर दुसरे साहित्य संमेलन |
पालकमंत्री पदाचे खरे हक्कदार ना. शिवेंद्रराजेच : श्रीरंग काटेकर |
बुलेट सायलेन्सर वर सातारा शहर वाहतूक शाखेची कारवाई |
मानवी मूत्रापासून ऊर्जानिर्मिती |
सार्वजनिक बांधकामच्या प्रकल्पांसाठी निधी कमी पडणार नाही |
उद्यापासून सातारा येथील सेव्हन स्टारमध्ये माय मराठी महोत्सवास प्रारंभ ! |
अजिंक्यतारा कारखान्याला तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार |
बिबट्याच्या हल्ल्यात सातारचे वनक्षेत्रपाल जखमी |
सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर कारवाई |
जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री बदला, अन्यथा उपोषण |
सासवडच्या अल्पवयीन मुलावर डॉक्टरांकडून चुकीचे उपचार |
बुलेट सायलेन्सर वर सातारा शहर वाहतूक शाखेची कारवाई |
मानवी मूत्रापासून ऊर्जानिर्मिती |
सार्वजनिक बांधकामच्या प्रकल्पांसाठी निधी कमी पडणार नाही |
उद्यापासून सातारा येथील सेव्हन स्टारमध्ये माय मराठी महोत्सवास प्रारंभ ! |
अजिंक्यतारा कारखान्याला तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार |
बिबट्याच्या हल्ल्यात सातारचे वनक्षेत्रपाल जखमी |
सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर कारवाई |
जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री बदला, अन्यथा उपोषण |
सासवडच्या अल्पवयीन मुलावर डॉक्टरांकडून चुकीचे उपचार |
छत्रपती शाहू क्रीडा संकुलातील गैरवस्थापनावर क्रीडा प्रशिक्षकाचे बोट |
'अजिंक्यतारा'चे कामकाज सहकारी कारखानदारीसाठी दिशादर्शक |
प्रतापगड साखर कारखान्याकडू प्रतिटन ३ हजार रुपयांप्रमाणे ऊस बिल जमा |
एसटीच्या चाकाखाली सापडून वृद्धाचा मृत्यू |
विडणी खून प्रकरणातील तिसऱ्या दिवशी शेतात हातासह हत्यारे सापडल्याची माहिती |