सातारा : महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 मधील नियम 54 अ मध्ये सुधारणा करुन नवीन नियम निर्गमित करण्यात आले आहे. या अधिसूचनेमध्ये आकर्षक, पसंतीचा नोंदणी क्रमांक जारी करण्याच्या शुल्कामध्ये सुधारणा करण्यात आली आहे.
सुधारीत अधिसूचना पाहण्यासाठी वाहन धारकांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रोदशिक परिवहdन अधिकारी दशरथ वाघुले यांनी केले आहे.