सातारा : एकाला दमदाटी केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 19 रोजी बारा वाजण्याच्या सुमारास तामजाई नगर येथे मन्सूर जब्बार शेख रा. तामजाई नगर, सातारा यांच्या गाडीचे नुकसान करून त्यांना दमदाटी केल्याप्रकरणी चव्हाण (पूर्ण नाव माहित नाही) रा. कोटेश्वर अपार्टमेंट, तामजाई नगर, सातारा आणि त्यांच्या सोबतच्या दोन अनोळखी लोकांविरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.