बंजारा जमातीचा समावेश अनुसूचित जमातीत करावा

सद्गुरु सेवालाल फाउंडेशनचे जिल्हा प्रशासनाला निवेदन

by Team Satara Today | published on : 12 September 2025


सातारा,  दि.  १२ : तेलंगणा व आंध्र राज्य यांनी बंजारा लमाण समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा दिला आहे.  महाराष्ट्रातही केंद्र सरकारने लमाण राठोड बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करावा अशी मागणी सद्गुरु सेवालाल फाउंडेशन सातारा यांच्यातीने करण्यात आली आहे. 

फाउंडेशनचे अध्यक्ष अर्जुन राठोड यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासन निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांची भेट घेतली. यावेळी नामदेव जाधव राजू चव्हाण कृष्णा राठोड यांची उपस्थिती होती या निवेदनात नमूद आहे की,  संघर्ष योद्धा मनोज तरंगे पाटील यांच्या आंदोलनानंतर शासनाने मराठा बांधवांना हैदराबाद गॅझेट लागू केले आहे.

शासन स्तरावर हे गाजर अधिकृतपणे स्वीकारल्याने अमलात आले असल्यामुळे त्याचा आधार घेऊन महाराष्ट्रातील बंजारा लामाण समाजाला अनुसूचित जमातीच्या प्रवर्गात समावेश करावे आणि येथील आरक्षणाचा लाभ देण्याची कार्यवाही करावी तसा प्रस्ताव केंद्र शासनाने पाठवण्यात यावा अशी बंजारा समाजाच्या शिष्टमंडळाची मागणी आहे. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद इतर मागासवर्गीय महिला प्रवर्गासाठी राखीव
पुढील बातमी
रविवार पेठ येथील नागरिकांचा बोंबाबोंब आंदोलनाचा इशारा

संबंधित बातम्या