सोमनाथ पवार यांचे जिल्हा परिषद आरोग्य विभागामध्ये आंदोलन

नागठाणे येथील घाडगे रुग्णालय बंद करण्याची केली मागणी

by Team Satara Today | published on : 16 January 2025


सातारा :  मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे माजी प्रभाग समिती सदस्य सोमनाथ बळवंत पवार यांनी नागठाणे येथील घाडगे रुग्णालय तात्काळ बंद करावे, या मागणीसाठी जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलीपे यांच्या दालनाबाहेर आंदोलन केले, मात्र यासंदर्भात ही बाब न्यायप्रविष्ठ असल्याचे सांगत खलीपे यांनी पुढील कार्यवाही करण्यास नकार दिला आहे. 

याबाबतची अधिक माहिती अशी दिनांक 1 फेब्रुवारी 2023 रोजी घाडगे रुग्णालयामध्ये एका महिलेचे बाळ डॉक्टर ऐवजी कंपाउंडर ने प्रसुती केल्याने दगावले होते. याबाबत सोमनाथ पवार यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली असता, डॉक्टरवर 302 कलम लावण्यास परवानगी देण्यात आली. आरोपी डॉक्टर यांनी सर्वोच्च न्यायालयात या निर्णयाला आव्हान दिले असता, सर्वोच्च न्यायालयाने आरोपी डॉक्टर यांचे सर्व अर्ज फेटाळले असल्याचे निवेदनात नमूद आहे. या संदर्भात डॉक्टर महेश खलीपे या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी नागठाणे येथील घाडगे रुग्णालय बंद करावे. हा अत्यंत गंभीर प्रकार आहे आणि संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पवार यांनी केली. या संदर्भात त्यांनी 1 जानेवारी रोजी खालीपे यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. मात्र खलीपे यांनी कोणतीही कार्यवाही न केल्याचा ठपका ठेवत सोमनाथ पवार आणि संबंधित महिला व तिचे पती यांनी गुरुवारी जिल्हा परिषदेच्या इमारतीत आरोग्य विभागाच्या दालनाबाहेर आंदोलन सुरू केले आहे. 

खलीपे या संदर्भात बोलताना म्हणाले, ही बाब न्यायप्रविष्ठ आहे संबंधित डॉक्टरांनी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली आहे. वकील अभिप्रायानुसार, या संदर्भात मी कोणतीही कारवाई करू शकत नाही. मात्र सोमनाथ पवार यांनी या प्रकरणाचा इन्कार करत सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात कोणताही हस्तक्षेप केला नाही. त्याच्या ऑर्डर्स उपलब्ध आहेत असल्याचे सांगत खलीपे कर्तव्य कसुरी करत असल्याचा आरोप केला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सुसाट कंटेनरने 10 ते 15 जणांना उडवले
पुढील बातमी
सिम्बोयसिस हॉस्पिटल ते राजमाता सुमित्राराजे उद्याना दरम्यान पोलिसांच्या गस्तीची गरज

संबंधित बातम्या