क्रांती दिनानिमित्त हुतात्मा स्मारकासह शहीद कर्नल संतोष महाडिक स्मारकास अभिवादन

by Team Satara Today | published on : 09 August 2026


सातारा : क्रांती दिनानिमित्त सातारा नगरपालिकेच्या वतीने हुतात्मा स्मारक तसेच शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या स्मारकास अभिवादन करण्यात आले. यावेळी स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्मे आणि देशासाठी बलिदान देणार्‍या वीरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या स्मारकास अभिवादन करून करण्यात आली. त्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच क्रांतिसिंह नाना पाटील आणि महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी स्वातंत्र्यसैनिकांची उपस्थिती विशेष ठरली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणार्‍या स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण करून त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

कार्यक्रमास नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष ड. डी.जी. बनकर, आरोग्य समिती सभापती शंकर किर्दत, नगरसेवक रविराज किर्दत, नगरसेवक शंकर माळवदे, नगरसेविका आशा डगळे, नगरसेविका सीमा भोसले, नगरसेवक सुधाकर यादव, नगरसेवक सचिन पाटोळे यांच्यासह नगरपालिका पदाधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
फलटण ग्रामीणमध्ये लुटमारीच्या तयारीतील टोळी जेरबंद
पुढील बातमी
कास पठारावरील गणेश खिंडीत ड्रोन दरीत अडकला; शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमने केली तत्पर मदत

संबंधित बातम्या