राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन

by Team Satara Today | published on : 21 March 2025


सातारा : राज्य शासनाने नवीन केलेल्या कायद्यांच्या माध्यमातून नागरिकांची लूट होत आहे .या निषेधार्थ राष्ट्रीय समाज पक्षाचे सातारा लोकसभा अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर काल सकाळी 11 वाजता धरणे आंदोलन करण्यात आले. शासनाच्या चुकीचा धोरणांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

या आंदोलनामध्ये डॉक्टर रमाकांत साठे, रघुनाथ सकट, किरण माने, उमेश चव्हाण, सतीश शिंदे,  आतिश कांबळे, इत्यादी. आंदोलनात सहभागी झाले होते. याबाबतचे निवेदन जिल्हा प्रशासनाचे निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना सादर करण्यात आले.

या निवेदनात नमूद आहे की शासनाने सर्वसामान्य लोकांना न परवडणारे ऑनलाइन पद्धतीचे कायदे केले आहेत. अनेक शासकीय योजनांचा इंटरनेटच्या ज्ञानाअभावी लोकांना लाभ मिळत नाही. मुला-मुलींना शाळेचे दाखले वेळेवर मिळत नाही, इंद्रा आवास घरकुल योजना, पारधी आवाज घरकुल योजना यांच्या अटी शर्ती पूर्ण करताना नागरिकांची परवड होत आहे. ज्या महिलांचे बँकेने सिबिल खराब केले आहे ते दुरुस्त करून त्यांना पुन्हा कर्ज देण्यात यावे,  यशवंत घरकुल योजनेअंतर्गत तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत किमान पाच लाख रुपये अनुदान देण्यात यावे, अपंग परिकथा, विधवा महिलांना पाच हजार रुपये मानधन मिळावे, अशा विविध मागण्या या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आल्या. मंगेश चव्हाण, महेश वायदंडे, विजय पवार, प्रशांत कोळी, संदीप पवार, मोहित बडेकर, वैष्णवी सुतार, आतिश कांबळे, किरण माने, यांच्या स्वाक्षरी या निवेदनावर आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी चौघांना न्यायालयाकडून दंड
पुढील बातमी
बर्गेवाडी येथे शिकार करण्याच्या प्रयत्नात दोघे ताब्यात

संबंधित बातम्या