खंडाळा गावच्या हद्दीत टँकर उलटल्याने चालक जागीच ठार

by Team Satara Today | published on : 11 April 2025


खंडाळा : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पारगाव खंडाळा गावच्या हद्दीत टँकर उलटल्याने हा अपघात झाला. या अपघातात टँकरचालक जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. अपघातात प्रवीण राजाराम शिंगटे (वय 39, रा. गोटखिंड, ता. वाळवा, जि.सांगली) असे मृत्यू झालेल्या चालकाचे नाव आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, बुधवारी (दि. 9) एका खासगी दूध कंपनीचा टँकर सांगलीहून पुण्याच्या दिशेने निघाला होता. रात्री सव्वादहाच्या सुमारास पारगाव खंडाळ्यातील काळभैरवनाथ मंदिर परिसरात टँकर अचानक पलटी झाला. यावेळी चालकासह दोन प्रवासी टँकरमध्ये प्रवास करत होते. टँकर पलटी होताच रस्त्याच्या कडेला असणार्‍या कठड्यावर जाऊन आदळल्याने कठडा तुटून टँकरच्या केबिनमध्ये शिरला. यामध्ये कठड्यावर डोके आदळल्याने ट्रकचालक प्रवीण शिंगटे यांचा जागीच मृत्यू झाला. तर सोबत प्रवास करणारे विकास अशोक फाळके (रा.सातारा) हे गंभीर जखमी जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती कळताच खंडाळा पोलिस व शिरवळ रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहचली. यानंतर मदतकार्य राबवण्यात आलो. याप्रकरणी मनोज यशवंत आरगडे यांनी खंडाळा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
बुद्धविचार हे सिद्ध, वारकरी आदी परंपरेत आढळुन येत आहे : ह.भ.प.ज्ञानेश्वर बंडगर
पुढील बातमी
तीन वर्षांच्या मुलीसह महिलेने विहिरीत उडी घेऊन संपवले जीवन

संबंधित बातम्या