मुसळधार पावसामुळे महाबळेश्वरातील पर्यटनस्थळांवर प्रवेशबंदी; आंबेनळी घाट वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद

by Team Satara Today | published on : 08 July 2026


महाबळेश्वर : मुसळधार पाऊस आणि पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वेण्णा लेक, लिंगमळा धबधबा, आर्थर सीट, एलिफंट्स हेड पॉइंट, केट्स पॉइंट, विल्सन पॉइंट, सावित्री पॉइंट, प्रतापगड परिसर, तसेच तापोळा परिसरातील पर्यटनस्थळांवर प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

धोकादायक ठिकाणी इशारा फलक, बॅरिकेड्स उभारण्याचे, तसेच आवश्यक त्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्याचे आदेशही प्रशासनाने दिले आहेत. याशिवाय, महाबळेश्वर–पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाट ३१ जुलैपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. घाट परिसरात वारंवार दरडी कोसळणे, दगड घसरणे, दाट धुके आणि रस्त्यावर मातीचा मलबा साचत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

अवघ्या सात दिवसांत २१२० मिलिमीटर पाऊस

महाबळेश्वर तालुक्यात गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. १ ते ७ जुलै या कालावधीत महाबळेश्वर शहरात तब्बल २१२०.४० मिलिमीटर (८३.४८० इंच) पावसाची नोंद झाली असून, अतिवृष्टीमुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी दरडी कोसळणे, झाडे उन्मळून पडणे, रस्त्यांवर मातीचा मलबा साचणे आणि दाट धुक्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मलकापुरात युनिक उड्डाणपुलाखाली स्लिपरोडवर पावसाचे पाणी साचल्यामुळे वाहतूक बंद; ठिकठिकाणी नाल्याची कामे अपुरी ठेवल्यामुळे कंत्राटदाराबद्दल संताप
पुढील बातमी
राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकविणे सक्तीचेच; न शिकवणाऱ्या शाळांना दंड; मान्यताही होणार रद्द

संबंधित बातम्या