साडेपाच लाखांच्या फसवणूक प्रकरणी वकिलासह दोन जणांविरोधात गुन्हा

सातारा : नोकरीच्या आमिषाने सुमारे साडेपाच लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी वकिलासह दोन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सन 2019 ते 2024 दरम्यान सुनील नारायण मोरे रा. करंजे नाका सातारा यांना जिल्हा परिषद सातारा येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी ओळख असल्याचे सांगून त्यांच्या मुलास अनुकंपा तत्वावर क्लार्क व शिपाई पदावर नोकरी लावून देतो असे सांगून त्यांच्याकडून त्यांच्या मुलासह इतर विद्यार्थ्यांसाठी एकूण पाच लाख तीस हजार रुपये ऑनलाईन घेऊन बनावट नियुक्तीपत्र देऊन, नोकरी न लावता आणि पैसे न परत करता आर्थिक फसवणूक केली आहे. तसेच पैसे परत मागितले असता मोरे यांना खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी एडवोकेट तय्यब आलमगीर मुल्ला रा. संगमनगर, सातारा आणि आशिष रमेश माने रा. कटापूर, ता. कोरेगाव जि. सातारा यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मोरे करीत आहेत.


मागील बातमी
एकाच्या मृत्यूप्रकरणी ट्रॅक्टर चालकावर गुन्हा
पुढील बातमी
मारहाण प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा

संबंधित बातम्या