छ. संभाजीराजे यांच्या बलिदान दिनानिमित्त साताऱ्यात विविध कार्यक्रम; धर्मवीर ज्वालाचे स्वागत, मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके, मूक पदयात्रा

by Team Satara Today | published on : 18 March 2026


सातारा : स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या 337 व्या बलिदान स्मरण दिनानिमित्त शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान राजधानी सातारा यांच्या वतीने चौपाटी राजवाडा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी नऊ ते सायंकाळी सहा यादरम्यान धर्मवीर ज्वालाचे स्वागत, मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके, मूक पदयात्रा असे कार्यक्रम होणार आहेत .

नियोजन समितीच्या वतीने देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद आहे की सकाळी नऊ वाजता श्रीक्षेत्र वडू बुद्रुक येथून आणलेल्या धर्मवीर ज्वालाचे  आगमन व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीस मान्यवरांच्या हस्ते अभिषेक पूजन व श्लोक पठण करण्यात येणार आहे सायंकाळी पाच वाजता राजवाडा चौपाटी येथे मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहेत.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानानिमित्त राजवाडा येथून मूक पदयात्रा काढण्यात येणार आहे. संभाजी महाराज यांच्या 337 व्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वाढती महागाई, पेट्रोल-डिझेल-गॅसची टंचाईच्या निषेधार्थ जिल्हाध्यक्ष ॲड. दयानंद माने यांच्या नेतृत्वाखाली साताऱ्यात वंचितची निदर्शने
पुढील बातमी
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य अध्यक्षपदी प्राचार्या प्रमोदिनी मंडपे यांची निवड ; सातारा येथे झालेल्या राज्य बैठकीत निर्णय

संबंधित बातम्या