कॉकरोच जनता पार्टीचा दिल्लीत एल्गार; अभिजीत दीपकेंच्या पक्षाकडून ५ सप्टेंबरला मोर्चाची घोषणा

by Team Satara Today | published on : 24 August 2026


दिल्ली : कॉकरोच जनता पार्टीने केंद्र सरकारविरोधात पुन्हा आंदोलनाची हाक दिली आहे. सीजेपीकडून ५ सप्टेंबर २०२६ रोजी नवी दिल्लीत शांततापूर्ण मोर्चा काढण्यात येणार आहे. 

इंडिया गेटपासून सुरू होणारा हा मोर्चा नवी दिल्ली पोलिस मुख्यालयाच्या दिशेने जाणार असल्याचं पक्षाने जाहीर केलं आहे. या आंदोलनात देशभरातील विद्यार्थी, तरुण, युवा संघटना आणि नागरिक सहभागी होण्याची शक्यता आहे. 

विशेष म्हणजे, NEET परीक्षेशी संबंधित प्रकरणांमध्ये जीव गमावलेल्या विद्यार्थ्यांचे कुटुंबीय आणि पोलिसांकडून झालेल्या मारहाणीचा सामना केलेल्या तरुणांचे कुटुंबीय या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
५८ लाख नोंदींची यादी द्या; शिष्टमंडळासमोर अंतरवाली सराटी येथे जरांगेंचा संताप, थेट शिंदे समितीशी फोनवरून खलबते
पुढील बातमी
नाशिकमधील कुंभमेळ्यावर कोट्यवधींचा खर्च, मात्र राज्यातल्या मराठी १२५ शाळा बंद; सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी सुनावले खडे बोल

संबंधित बातम्या