पिंपोडे बुद्रुक : तडवळे सं वाघोली (ता. कोरेगाव) येथे रविवार दि.७ रोजी पहाटे रेल्वे अपघातात एका युवकाचा मृत्यू झाल्याची नोंद वाठार पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
वाठार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत रेल्वे धडकेत डोक्याला गंभीर दुखापत होऊन तसेच दोन्ही पाय तुटल्याने एक इसम जागीच ठार झाल्याचे आढळले. सोलापुरे हा आयटी इंजिनिअर आहे त्याच्या खिशात कन्नड भाषेतील चिठ्ठी आढळून आली आहे .मृत व्यक्तीची ओळख गिरीशकुमार वराप्पा सोलापुरे (वय अंदाजे ३२, रा. बेळगाव, कर्नाटक) अशी पटली आहे. वाठार–सालपे रेल्वे अप लाईनवरील तडवळे हद्दीत रात्री २ वाजण्यापूर्वी ही घटना घडली असून मृतदेह पुढील तपासासाठी रुग्णालयात हलविण्यात आला असून,या घटनेची फिर्याद रेल्वेचे सहाय्यक फौजदार अशोक मारुती हजारे यांनी दिली असूनसदर प्रकरणी वाठार पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली असून अधिक तपास पो.ह.वा. साबळे करीत आहेत.