म्हासुर्णे येथे गुरुवार, दि. 4 डिसेंबर रोजी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन

by Team Satara Today | published on : 22 November 2025


पुसेगाव :  जिल्हा परिषद शिक्षण विभाग,सातारा, पंचायत समिती शिक्षण विभाग व श्रीराम विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने , म्हासुर्णे येथे आयोजित केलेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवार,  दि. 4 डिसेंबर रोजी होणार आहे.

विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन मायणीच्या कला वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. गोरोबा खुरपे यांच्या हस्ते व संस्थेचे अध्यक्ष किसन माने यांच्या अध्यक्षतेखाली व माध्यमिक शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी, शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, उपशिक्षणाधिकारी तेजस गंबरे, गटशिक्षणाधिकारी सौ. सोनाली विभुते, गटविकासधिकारी योगेश कदम, शिक्षणविस्तारधिकारी सौ. संगीता गायकवाड, केंद्र प्रमुख रफिक मुलाणी, संंस्थेेचे सचिव पांडुरंग माने, संचालक राजाराम माने, महादेव माने, मुख्याध्यापक प्रमोद हांडे, विज्ञान संघटनेचे अध्यक्ष संदीप त्रिंबके, उपाध्यक्ष दिलीपराव साबळे, अंबादास भंडारे यांच्या उपस्थितीत होणार आहे.

हे प्रदर्शन 4 ते 6 डिसेंबर अखेर श्रीराम विद्यामंदिर, म्हासुर्णे येथे आयोजित करण्यात आले आहे. तालुक्यातील सर्व शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी तसेच विज्ञानप्रेमींनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन गटशिक्षणाधिकारी सौ. सोनाली विभुते, शिक्षणविस्तारधिकारी सौ.संगीता गायकवाड, केंद्रप्रमुख रफिक मुलाणी यांनी केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा पालिकेसमोर वेगवान गाडीचा थरार; भरारी पथकाच्या गाडीला धडक; चार वाहनांचे नुकसान
पुढील बातमी
रस्ता न दिल्याच्या कारणावरून एसटी चालकाला मारहाण; सहा जणांवर गुन्हा दाखल

संबंधित बातम्या