शाहुपुरी येथील सनराईन मॉर्निंग ग्रुपतर्फे महिला दिनी कामगार महिलांचा सत्कार व भांडी वाटपाचा कार्यक्रम

by Team Satara Today | published on : 08 March 2026


सातारा : शाहुपुरी येथील सनराईन मॉर्निंग ग्रुपतर्फे महिला दिनाचे औचित्य साधून समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील घरेलु कामगार महिलांचा सत्कार व त्यांना भांडी वाटपाचा कार्यक्रम दि. 8 मार्च  रोजी अंबदरे येथील महालक्ष्मी मंदिर येथे झाला. 

यावेळी विशेष अतिथी म्हणून नामदेव हेंद्रे,.नरेंद्र ढवळे, सौ.नेहा शिंदे आणि पायल जाधव हे उपस्थित होते.

कार्यक्रमास ग्रुपचे सर्व सदस्य प्रा.डॉ. राजन मोरे,अयुब तांबोळी, दिपक ओवाळ, महेश शिंदे, नंदन खोले, सिध्दाप्पा पवार, सतीश जाधव, दत्तात्रय खटावकर, सुरेश दुदुस्कर, दिघे टेलर उपस्थित होते.

यावेळी अयुब तांबोळी,सतीश जाधव,नरेंद्र ढवळे,नामदेव हेंद्रे, सौ.नेहा शिंदे व पायल जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
खरेदीदार विक्रेता संमेलन महिला उद्योजकांसाठी पर्वणी - डॉ. प्रियाताई शिंदे; रविवारमुळे प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी
पुढील बातमी
बोबडेवाडीत जागतिक महिला दिनानिमित्त एकल महिलांचा सत्कार; मिळकत कर भरणाऱ्यांचा बक्षीस देऊन गौरव

संबंधित बातम्या