जरंडेश्‍वर नाका परिसरात भरधाव दुचाकीस्वाराची तरुणाला जोराची धडक; अपघात प्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 12 August 2026


सातारा : जरंडेश्‍वर नाका परिसरात मारुती मंदिराजवळ पायी जात असलेल्या तरुणाला भरधाव दुचाकीस्वाराने पाठीमागून जोराची धडक दिल्याची घटना 8 ऑगस्ट रोजी रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात संबंधित युवक जखमी झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बंदेनवाज श्रीमंत गायकवाड (वय 31, रा. वाढे, ता. जि. सातारा) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, गायकवाड हे जरंडेश्‍वर नाका येथील मारुती मंदिराजवळून पायी जात असताना पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वाराने त्यांना जोराची धडक दिली.

धडकेनंतर गायकवाड खाली पडल्याने त्यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत होऊन तो फ्रॅक्चर झाला. अपघातानंतर त्यांनी दुचाकीचा क्रमांक पाहिला असून, ती पल्सर मोटारसायकल (क्र. एमएच-11 डीएम-9426) असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणी अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार ढमाळ करीत आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
उधारीच्या पैशांवरून शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा
पुढील बातमी
विषारी औषध प्राशन केलेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू

संबंधित बातम्या