सातारा : पत्नीचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीविरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पत्नीचा जाचहाट केल्याप्रकरणी संजय उत्तम कांबळे (वय 53, रा.कृष्णानगर, सातारा) याच्याविरुध्द सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पत्नी उर्मिला संजय कांबळे (वय 44, कृष्णानगर, सातारा) यांनी तक्रार दिली आहे. 2003 पासून वेळोवेळी शारीरीक छळ करत शिवीगाळ, दमदाटी केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस हवालदार जाधव करीत आहेत.