फलटण : फलटण शहर परिसरात वाढत चाललेल्या चोर्या, मारामारीच्या घटना, रोडरोमिओ यांच्यापासून होणार्या त्रासांमधून व्यापारी व नागरिकांची मुक्तता करण्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तींचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावी, अशा मागणीचे निवेदन फलटण व्यापारी संघटनेच्यावतीने पोलीस निरीक्षक काळे यांना बुधवारी देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, फलटण शहरामध्ये सध्या चोर्या, गंभीर गुन्हे वाढत आहेत. अशा घटनांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करणे आवश्यक आहे. व्यापारी सरकार व पालिकेचे सर्व कर भरत असतो. त्यांना संरक्षण देणे, हे आपले प्राथमिक कर्तव्य आहे. यासाठी आपल्याला यापूर्वीही निवेदने देण्यात आली होती. मागील सलग दोन दिवसांमध्ये व्यापार्यांवर हल्ले झाल्याने, व्यापारी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या सर्व गोष्टींना वेळीच आवर घालून, व्यापारी व नागरिकांना भयमुक्त करावे.