शाहूपुरी चौक ते आंबेदरे रोडवरअज्ञात वाहनांच्या धडकेत महिला जखमी

by Team Satara Today | published on : 27 January 2026


सातारा : शाहूपुरी चौक ते आंबेदरे रोडवर अज्ञात वाहन चालकाने पायी चालणाऱ्या महिलेला धडक देऊन जखमी केले आहे. सुनंदा वामन जाधव (वय ६०,रा. आंबेदरे रोड, शाहूपुरी, सातारा) असे जखमी महिलेचे नाव आहे. अपघातात महिलेच्या पायाला, हाताला जखम झाली आहे. ही घटना दि. २४ रोजी सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास घडली आहे. महिलेच्या फिर्यादीवरून शाहूपुरी पोलिसांत अज्ञाताविरोधात फिर्याद दिली असून अधिक तपास पोलीस हवालदार मकले करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कास रस्त्यावर यवतेश्वर येथे दारू पिऊन धिंगाणा केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
पुढील बातमी
प्रजासत्ताक दिनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

संबंधित बातम्या