सातारा : वडूथ येथे एकाला मारहाण केल्याप्रकरणी चारजणांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वडूथ, ता. सातारा येथील हॉटेल ग्रीनलॉनमध्ये वादावादी, मारहाण झाली. दि. 5 रोजी सायंकाळी 6.30 वाजता हा प्रकार घडला. सातारा तालुका पोलीस ठाण्यात अमित अशोक साबळे (वय 43, रा. शिवथर, ता. सातारा) यांनी फिर्याद दिली असून, सत्यवान आकाश मोकाशी, विकास देशमुख, मंगेश श्रीरंग कदम व अन्य एका अनोळखी व्यक्तीवर (सर्व रा. बसाप्पाचीवाडी, ता. सातारा) गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस हवालदार मंडले तपास करत आहेत. दरम्यान, या प्रकारावरुन परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
ऐन निवडणूकीत इच्छुकांकडून देवाचा धावा
November 12, 2025
साताऱ्यातील रस्त्यांवर तृतीय पंथियांकडून नाकाबंदी
November 12, 2025
कोरेगावमध्ये डंपरचे काम बंद करण्यावरून राडा; सहा जणांवर गुन्हा
November 11, 2025
बहिणीवर अत्याचार केल्याप्रकरणी अल्पवयीन मावस भावावर गुन्हा
November 11, 2025
वाढे फाटा येथे झालेल्या अपघातप्रकरणी पिकअप चालकावर गुन्हा
November 11, 2025
कारंडवाडी येथील बसस्टॉप जवळ मारहाणप्रकरणी परस्परविरोधी तक्रारी
November 11, 2025
सदरबाजारमध्ये जुन्या भांडणाच्या कारणातून एकावर कोयत्याने हल्ला
November 11, 2025
इलेक्ट्रिक दुचाकीची जिल्हा न्यायाधीशाच्या गाडीला धडक; दुचाकीचालक जखमी
November 11, 2025
कापडगाव हद्दीत अपघातात आयशर-मोटारसायकल धडकेत युवक ठार; दोघे गंभीर जखमी
November 11, 2025