पंढरपूर : पुन्हा एकदा विठ्ठल मूर्ती झिजू लागल्याचे पुरातत्व विभागाकडून सांगितल्यानंतर परत मूर्तीला एपॉक्सी लेपन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल मूर्तीची झीज होत असल्याने चिंता व्यक्त केली जातेय. पूर्वी विठ्ठल मंदिर बडव्यांच्या ताब्यात असताना कधीही त्यावर अशा पद्धतीचा वजरलेप अथवा लेपन केल्याच्या नोंदी आढळून येत नाहीत. मात्र 1985 सालानंतर शासनाकडे मंदिर आले आणि त्यानंतर सातत्याने जवळपास पाच वेळा मूर्तीवर विविध रासायनिक प्रक्रिया करण्यात आल्या.
सर्व प्रक्रिया पुरातत्व विभागाकडूनच करण्यात येऊ नये मूर्तीची झीज मात्र थांबायला तयार नसल्याने आता विविध संघटना याबाबत आक्रमक होऊ लागल्या आहेत. ३७ वर्षात पाचवेळा करण्यात आली लेपन प्रक्रिया
खरे पहाता देवतेच्या मूर्तीवर कोणत्याही प्रकारे रासायनिक लेपन करणे, ही पूर्णतः धर्मशास्त्रविसंगत कृती आहे. मुळापासून उपाययोजना न काढता रासायनिक लेपनासारखी वरवरची उपाययोजना काढल्याने देवतेच्या मूर्तीवर विपरीत परिणाम होऊ शकतात.
याबाबत मंदिर समिती व प्रशासनाने मात्र सावध भूमिका घेत मूर्तीवर एपॉक्सीचा रासायनिक प्रक्रिया करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचे मंदिर समितीसह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले आहे.
आता मूर्तीवर कुठल्याही पद्धतीचे रासायनिक लेपन करण्यापूर्वी सर्व संत या क्षेत्रातील तज्ञ यांची समिती नेमून त्यानंतर लेपणाबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात येत आहे.
चंदनाचा लेप कपाळी कोरीव रेखण्यात आला.
होळी सणानिमित्त पांढऱ्या शुभ्र वस्त्र विठ्ठलाला नेसवण्यात आली. उद्या धुळवडीनिमित्त रंगांची उधळणही विठ्ठलावर केली जाते. होळीच्या निमित्त विठ्ठलाला दुधाने अभिषेक करण्यात आला.