सातारा : जागतिक दिव्यांग दिन हा 3 डिसेंबर रोजी साजरा करण्यात येतो. याचे औचित्य समाज कल्याण विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या दिव्यांगांच्या अनुदानित, विनाअनुदानित शाळा, कार्यशाळा व अनाथ बौद्धिक अक्षम मुलांची बालगृह यामधील विद्यार्थ्यांनी शाळा स्तरावर आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धा मध्ये प्रथम क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व दिव्यांग अव्यंग विवाहास प्रोत्साहित करण्यासाठी आर्थिक सहाय्याच्या योजनेंतर्गत पात्र झालेल्या लाभार्थ्यांना २५ हजार रुपयांचे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र देऊन मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या हस्ते देण्यात आले.
जिल्हा परिषदेमध्ये झालेल्या या कार्यक्रमास सदर कार्यक्रमास अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले, जिल्हा समाज कल्याण अधिकारी विद्यानंद चल्लावार, पशुसंवर्धन अधिकारी विनोद पवार, शिक्षणाधिकारी शबनम मुजावर उपस्थित होते.
प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करुन मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन म्हणाल्या, दिव्यांग मुलांना घडवण्यामध्ये मुलांच्या पालकांचा व शिक्षकांचा मोलाचा हातभार आहे. याच दिव्यांग मुलांमधून उद्याचे सुजान नागरिक, उच्च पदस्थ अधिकारी. डॉक्टर्स, इंजिनियर घडतील अशी आशा व्यक्त केली. दिव्यांग व्यक्तीनी सर्व क्षेत्रामध्ये प्राविण्य मिळवलेले आहेत. जिल्हा परिषद ही दिव्यांगाप्रती संवेदनशील असून दिव्यांगांच्या योजना राबवण्यासाठी आणि दिव्यांगांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही सांगितले.
पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावरील दिव्यांगांसाठी राखीव असलेला ५ टक्के निधी १०० टक्के खर्च करणेबाबत विभागांना सुचना दिल्या असलेबाबत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सिद यांनी कार्यक्रमाप्रसंगी सांगितले.
सातारा शहराजवळ जमिनीच्या वादातून फायरिंग |
मराठी विश्वकोशाचे ट्विटरवर दुसरे साहित्य संमेलन |
पालकमंत्री पदाचे खरे हक्कदार ना. शिवेंद्रराजेच : श्रीरंग काटेकर |
बुलेट सायलेन्सर वर सातारा शहर वाहतूक शाखेची कारवाई |
मानवी मूत्रापासून ऊर्जानिर्मिती |
सार्वजनिक बांधकामच्या प्रकल्पांसाठी निधी कमी पडणार नाही |
उद्यापासून सातारा येथील सेव्हन स्टारमध्ये माय मराठी महोत्सवास प्रारंभ ! |
अजिंक्यतारा कारखान्याला तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार |
बिबट्याच्या हल्ल्यात सातारचे वनक्षेत्रपाल जखमी |
सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर कारवाई |
जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री बदला, अन्यथा उपोषण |
सासवडच्या अल्पवयीन मुलावर डॉक्टरांकडून चुकीचे उपचार |
छत्रपती शाहू क्रीडा संकुलातील गैरवस्थापनावर क्रीडा प्रशिक्षकाचे बोट |
'अजिंक्यतारा'चे कामकाज सहकारी कारखानदारीसाठी दिशादर्शक |

प्रतापगड साखर कारखान्याकडू प्रतिटन ३ हजार रुपयांप्रमाणे ऊस बिल जमा |
एसटीच्या चाकाखाली सापडून वृद्धाचा मृत्यू |
विडणी खून प्रकरणातील तिसऱ्या दिवशी शेतात हातासह हत्यारे सापडल्याची माहिती |
सातारा जिल्ह्याला ‘पर्यटन जिल्हा’ म्हणून ओळख देणार : ना. एकनाथ शिंदे |
मारहाण प्रकरणी दोनजणांवर गुन्हा |