रुग्णांची हेळसांड करणाऱ्या यशवंत हॉस्पिटलवर कारवाई करा; सामाजिक कार्यकर्ते प्रवीण दस्के यांची मागणी

by Team Satara Today | published on : 17 October 2025


सातारा  : सातारा शहरातील यशवंत हॉस्पिटल हे महात्मा फुले जन आरोग्य योजनेत समाविष्ट आहे. तरीसुद्धा या योजनेमध्ये मंजूर झालेल्या प्रस्तावातील रुग्णांकडून रुग्णालय पैसे घेत आहेत. अशा रुग्णालयांवर जिल्हा आरोग्य यंत्रणेने कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रवीण धस्के यांनी पत्रकार परिषदेत केली.

यावेळी गणेश शेडगे आशा जाधव हे उपस्थित होते. प्रवीण धस्के म्हणाले, आशा जाधव यांचा मुलगा सागर जाधव यांना मेंदू विकाराचा त्रास झाला. त्यांना तातडीने येथील यशवंत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. या हॉस्पिटलला महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू असताना सुद्धा रुग्णाकडून पन्नास हजार रुपयांची मागणी करण्यात आली आणि ती पूर्ण न केल्यास रुग्णांची उपचार सेवा थांबवण्याची धमकी देण्यात आली.

हा प्रकार अत्यंत हीन स्वरूपाचा आहे रुग्णांच्या नातेवाईकांना या हॉस्पिटल कडून वारंवार त्रास दिला जात असून याबाबत बाहेर वाच्यता केल्यास स्वतः डॉक्टर अनिल पाटील आणि प्रशासन हे रुग्णांच्या नातेवाईकाला धमकी देत असतात. त्यामुळे या हॉस्पिटलमध्ये व डॉक्टर यांच्यावर योग्य ती कारवाई होऊन सातारा जिल्ह्यातील रुग्णांची चाललेली हेळसांड तात्काळ थांबवण्यात यावी अशी मागणी धस्के यांनी केली. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कामाचे पैसे मागितल्‍याच्या कारणातून मारहाण करणाऱ्याच्या विरोधात गुन्हा
पुढील बातमी
९९ व्या साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचे शनिवारी उद्घाटन; इतिहासात प्रथमच तरुण, लोकप्रिय लेखकाला कार्यालयाचे उद्घाटन करण्याचा मान

संबंधित बातम्या