लिंगायत समाज हिंदू धर्माचा अविभाज्य घटक : खासदार अजित गोपछडे

by Team Satara Today | published on : 15 September 2024


सातारा : लिंगायत समाज हा हिंदू धर्माचा अविभाजक घटक असून, काही संघटना काही लोक लिंगायत हा वेगळा धर्म असल्याचे सांगत आहेत, याबाबत लोकांच्या जनजागृती व्हावी यासाठी हिंदू वीरशैव लिंगायत समाजातर्फे वीरशैव लिंगायत समाज सन्मान यात्राचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती खा. डॉ. अजित गोपछडे यांनी दिली.
ते म्हणाले, आज काही मंडळी लिंगायत समाजाला हिंदू धर्मापासून दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत. विरोधकांच्या या डावाला आम्ही बळी पडणार नाही. लिंगायत धर्म हा हिंदू धर्माचा अविभाज्य घटक आहे. संपूर्ण राज्यामध्ये एक ते सव्वा कोटी लिंगायत समाज आहे. लिंगायत समाजाच्या 57 पोटजाती आहेत.
1982 साली समाजाचे 22 आमदार होते पण आज पाच आमदार आहेत. समाजातील व्यक्तींनी गटतट विसरून एकत्र येणे काळाची गरज असल्याचे मत खासदार तथा वीरशैव लिंगायत समाज सन्मान यात्रेचे सर्वेसर्वा डॉ. अजित गोपछडे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
खा. गोपछडे राज्यातील म्हणाले, समाजाला एकत्र करणे, महात्मा बसवेश्वर यांचा समता व बंधुताचा संदेश सर्व समाजांना सांगणे यासाठी राज्यात वीरशैव लिंगायत समाज सन्मान यात्रा काढण्यात आली आहे. राज्यातील 16 जिल्ह्यातून ही यात्रा जात आहे. मंगळवेढा येथे यात्रेचा समारोप होणार आहे. याप्रसंगी जगतगुरु पासून सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. वीरशैव लिंगायत सन्मान यात्रेचे संपूर्ण राज्यात जोरदार स्वागत करण्यात आले. लिंगायत समाजाबरोबरच अन्य समाजाने यात्रेचे स्वागत केले आहे. समाजाच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी तसेच समाजाला एकत्र करण्यासाठी यात्रा काढण्यात आल्याचे खा. गोपछडे यांनी सांगितले.
यावेळी  श्री गुरुवर्य 108 महादेव शिवाचार्य वाईकर महाराज, नितीनजी शेटे समन्वयक हिंदू वीरशैव लिंगायत यात्रा, श्रावण जंगम अध्यक्ष राष्ट्रीय जंगम संघटना उपाध्यक्ष हिंदू वीरशैव लिंगायत मंच, सातारा लोकसभा संयोजक सुनीलतात्या काटकर, भाजपा सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, कराड उत्तर मंडल अध्यक्ष शंकरराव शेजवळ,हिंदू वीरशैव लिंगायत मंच जिल्हासंयोजक सातारा आप्पासाहेब कोरे  प्रा. राजेंद्र शेजवळ, महेंद्र बाजारे, विजय गाढवे, निवास कांमळे, नंदू गुरसाळे, संजय पानसरे,  रविंद्र मेनकर, बापू  चौकवाले, दादा कळसकर, माधव मेंडिगिरी, राजेंद्र बारवडे, सुनीता साखरे, शारदा देवर्षि, इंदु कोरे, चंदाताई जंगम, भाजपा जिल्हाचिटणीस दिपाली खोत, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे, डॉक्टर उत्कर्ष रेपाळ, डॉक्टर सचिन भोसले, रवी आपटे, सोशल मीडिया जिल्हा प्रभारी रवी लाहोटी, सातारा शहर सरचिटणीस प्रवीण शहाणे, विक्रांत भोसले, सिने कामगार आघाडी अध्यक्ष विकास बनकर, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित भिसे, विजय नाईक उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साहेबराव पवार यांचे विचार मार्गदर्शक : पृथ्वीराज चव्हाण
पुढील बातमी
तडीपार सराईत दुचाकी चोरटा जेरबंद

संबंधित बातम्या