सातारा : सदर बझार येथे दोन महिलांचे चेन स्नॅचिंग केल्याप्रकरणी अज्ञाता विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सदर बाजार परिसरात राहणाऱ्या महिला दिनांक 31 रोजी दुपारी साडेबारा वाजता जरंडेश्वर नाका परिसरातून चालत निघाल्या असता दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मिनी गंठण हिसकावून पोबारा केला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार देशमुख करीत आहेत.
सदर बझार येथे दोन महिलांचे चेन स्नॅचिंग केल्याप्रकरणी अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल
by Team Satara Today | published on : 01 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा