पालकमंत्री पदाचे खरे हक्कदार ना. शिवेंद्रराजेच : श्रीरंग काटेकर

ना.शिवेंद्रराजेंवर अन्याय होत असल्याचे जनतेत भावना...

सातारा : सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी (शरदचंद्रजी पवार )गटाचा सुपडा साफ करण्यामध्ये श्रीमंत. छ.खा. उदयनराजे भोसले यांची योगदान मोलाचे ठरले असून, संपूर्ण जिल्ह्याचे ते आता केंद्रबिंदू ठरले आहेत. लोकसभेच्या झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत श्रीमंत. छ.खा,उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचा पराभव करून टायगर अभी जिंदा है दाखवून दिले. अर्थात राष्ट्रवादीचा असलेला हा बालेकिल्ला नेस्तेभूत करण्यामध्ये सातारचे ना. शिवेंद्रराजे भोसले यांचा मोलाचा वाटा आहे. विकासभूमुखी असणारे या नेतृत्वाने दूरदृष्टीने भाजपची वाट धरली आणि पाहता पाहता ते राज्याच्या नेतृत्वाच्या गळ्यातील ताईत झाले. संयमी व प्रभावी संघटन कौशल्याची त्यांनी चुणूक दाखवून अल्पावधीत जिल्ह्याच्या व राज्याच्या राजकीय पटलावर आपले स्थान भक्कम केले. सलग पाच वेळा सातारा तालुक्यातून विजय होण्याचा बहुमान त्यांनी मिळविला. सातत्याने  विकास व प्रगतीचा ध्यास घेऊन वाटचाल करणारे, या नेतृत्वाला भाजपच्या नेतृत्वाने दखल घेऊन त्यांना राज्याच्या राजकारणात मानाचे स्थान देताना राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्रीपद सन्मानाने बहल केले. अर्थात हे पद देताना त्यांना सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री पदाचा बहुमान प्राप्त होईल अशी अशा सर्वञ जिल्हावासीयांना होती परंतु राज्याच्या राजकीय घडामोडीत या गुणवंत नेतृत्वाला डावल्याची लोकभावना दिसून येत आहे. जिल्ह्याच्या सर्वच आमदारांशी व मंत्र्यांशी स्नेहपूर्वक संबंध असणाऱ्या ना.शिवेंद्रराजे भोसले यांना पालकमंञी पदाची संधी प्राप्त झाली असती तर, जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीला खऱ्या अर्थाने गती प्राप्त झाली असती. अशी भावना आता जनतेतून जोर धरू लागली आहे. 

परंतु राज्याच्या राजकारणात घडलेल्या घडामोडी पाहता, राजकारणात गुणवत्तेपेक्षा हितसंबंधांना अधिक प्राधान्यक्रम दिला जाते. परंतु त्याचा कळत न कळत राजकारणातील गुणी व गुणवत्ताधारक नेत्यांच्या राजकीय करिअरला बसतो असाच फटका ना शिवेंद्रराजे भोसले यांना बसला आहे. सातारा जिल्ह्याच्या राजकारणात भाजपने एक हाती सत्ता खेचून आणली. या जिल्ह्यात भाजपने ऐतिहासिक कामगिरी करीत चार भाजप विचाराचे आमदार निवडून आले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रथमच येथील जनतेने देशाचे पंतप्रधान ना. नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे खंबीर नेतृत्व असलेले मुख्यमंञी ना.देवेंद्र फडणवीस यांच्या विचारधारेला पसंती दिली आहे. सातारा जिल्ह्याने राज्याला चार भाजपचे आमदार देवून राष्ट्रवादी पक्षाचा (शरदचंद्रजी पवार गटाचा) सुपङा साफ केला आहे. यामध्ये ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी जिल्ह्याच्या राजकारणात केलेली साखर पेरणी उपयुक्त ठरली आहे. खरे तर तेच या जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचे हक्कदार असताना पाटणचे शिंदे गटाचे नेते ना.शंभूराजे देसाई यांची पालकमंत्री म्हणून झालेली निवड सर्वांनाच आश्चर्यचकित वाटते. सातत्याने सातारा तालुक्यातून गेली 25 वर्षे निवडून येणारे ना.शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर हा एक अन्याय झाल्याचे लोक भावना जनतेतून बोलले जात आहे. राजकारणातील एक सुसंस्कृत अनुभवी व संयमी नेतृत्वाला पालकमंत्री पदापासून वंचित राहावे लागले हे खरे तर लोकशाहीतील जनाधार असलेल्या नेतृत्वाचे दुर्देव आहे वास्तविक जिल्ह्याला लाभलेले भाजपची चार आमदारांच्या जोरावर ना.शिवेंद्रराजे भोसले  सहजपणे सातारच्या पालकमंत्र्याची माळ गळ्यात पडेल, ही अपेक्षा होती. परंतु राज्याच्या राजकारणातील कुटील ङावपेचात पाटणचे ना.शंभूराजेंनी बाजी मारली. यापूर्वी ही त्यानी सातारा जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारले, परंतु जिल्ह्याच्या राजकीय पटलावर त्याचा फारसा प्रभाव पडला नसल्याचे चित्र दिसून आले आहे.

प्रदीर्घ अनुभव असणारे ना. शिवेंद्रराजे भोसले यांची गुणवत्ता डावली गेल्याची भावना जनतेमध्ये आहे. संयमी नेतृत्व विकासात्मक दृष्टिकोन युवाशक्तीचे आधारस्तंभ सर्वपक्षीय नेत्यांची सलोख्याचे संबंध राजघराण्याचा वारसा सर्व धार्मियाबद्दल आदर, जनाधार असलेले नेतृत्व असे सर्व गुणसंपन्न असणाऱ्या ना. शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर अन्याय का? याबाबत जनतेतून आता उठाव होत आहे.

सातारा विधानसभा मतदारसंघातून सातत्याने विक्रमी मताने विजयी होणारे ना. शिवेंद्रराजे भोसले यांच्या आजवरच्या कार्यकर्तृत्वाची दखल घेऊन, खऱ्या अर्थाने त्यांना सन्मानपूर्वक सातारच्या पालकमंत्री पदाचा मान दिला पाहिजे होता. खरे तर जनाधार असलेल्या या नेतृत्वाने सामाजिक सांस्कृतिक, क्रीडा, सहकार व राजकीय क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकास व प्रगतीचे उद्दिष्टे प्राप्तीचे स्वप्न साकार करण्याची खऱ्या अर्थाने यावेळी सातारा जिल्ह्याला संधी आली असताना, पुन्हा एकदा राज घराण्यावर अन्याय झाल्याची भावना जनतेत वाढू लागली आहे. एकेकाळी स्वर्गीय सहकारत्न सहकार मंत्री अभयसिंह राजे भोसले हे राज्याच्या मुख्यमंत्री पदाचे दावेदार असताना त्यांच्यावरही असाच अन्याय झाल्याची खंत जनतेतून व्यक्त होत आहे.

नामदार शिवेंद्रराजेनी  आता एक पाऊल पुढे टाकणे  गरजेचे...
पंचवीस वर्षे आमदार असलेली शिवेंद्रराजे भोसले आता नामदार झाले आहेत. राजकीय परिपक्वता आलेल्या नामदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर पालकमंत्री पदाची जबाबदारी पक्षाने सोपविणे गरजेचे होते. परंतू संयमी व सुसंस्कृतपणा स्वभाव नडला की काय अशी सर्वत्र चर्चा ऐकायला मिळते. वास्तविक पक्ष नेतृत्वाने ठाम भूमिका घेणे गरजेचे होते. तसे पाहिले तर जिल्ह्यात व तालुक्यात भाजपचा झंझावत करण्यात राजघराण्याचा सिंहाचा वाटा राहिला आहे. आता ना. शिवेंद्रराजेनी एक पाऊल पुढे टाकणे आवश्यक आहे.  - श्रीरंग काटेकर सातारा
मागील बातमी
बुलेट सायलेन्सर वर सातारा शहर वाहतूक शाखेची कारवाई
पुढील बातमी
मराठी विश्वकोशाचे ट्विटरवर दुसरे साहित्य संमेलन

संबंधित बातम्या