जिल्हा परिषदेत सामाजिक न्याय दिन आणि राष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा

by Team Satara Today | published on : 27 June 2025


सातारा : जिल्हा परिषदेत 26 जून रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिन आणि राष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा करण्यात आला. 

यावेळी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) धनंजय चोपडे, कृषी विकास अधिकारी गजानन ननावरे, लेखाधिकारी योगेश करंजेकर आणि जिल्हा समाज कल्याण अधिकारी विद्यानंद चल्लावार यांच्यासह अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.

प्रथम राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे प्रतिमा पूजन आणि दिप प्रज्वलन करून सामाजिक न्याय दिन साजरा करणेत आला. तसेच राष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली.  यावेळी आपण व आपल्या आजूबाजूचा परिसर व्यसनमुक्त करणेसाठी कटीबध्द राहू, असे समाज कल्याण अधिकारी विद्यानंद चल्लावार यांनी सांगितले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा तालुक्यातील सरपंच पदाचे 4 जुलै रोजी फेर आरक्षण
पुढील बातमी
राहत्या घरातून एकजण बेपत्ता

संबंधित बातम्या