सातारा : वाढे, (ता. सातारा) येथील गौरी सचिनकुमार नलावडे यांना भारती अभिमत विद्यापीठाची पीएच.डी जाहीर झाली आहे. त्यांनी पीएच.डी साठी सादर केलेल्या प्रबंधात हिंदू मुलींच्या संयुक्त वारसा हक्काचा चिकित्सक आढावा घेतला आहे. ( Hindu daughter's coparcener rights: A critical review ) त्यांना भारती विद्यापीठाच्या विधी शाखेच्या डीन डॉ.उज्वला बेंडलेडर, प्रोफेसर डॉ.राजलक्ष्मी वाघ, हरियाणातील गुरुग्राम विधी शाखेच्या प्रोफेसर डॉ.सुजाता बाली यांचे विशेष सहकार्य - मार्गदर्शन लाभले. गौरी यांनी याआधी कला आणि विधी शाखेची पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. सहकार क्षेत्रातील मान्यवर दिवंगत ॲड.संभाजीराव नलावडे यांच्या त्या स्नुषा आणि बांधकाम व्यवसायिक सचिन नलावडे यांच्या पत्नी आहेत.
दरम्यान ,या यशाबद्दल गौरी नलावडे यांचे अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले. हा प्रबंध लवकरच पुस्तक रूपात प्रकाशित व्हावा ,अशी अपेक्षा या मान्यवरांनी व्यक्त केली आहे.