मुंबई : काल केंद्रीय निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांना राज्याच्या पोलीस महासंचालकपदावरून हटवले हते. त्यानंतर गृहविभगाने विवेक फळसणकर यांना प्रभारी महासंचालक पदाचा प्रभारी कार्यभार सोपविला होता. मात्र आता राज्याच्या पोलीस महासंचालकपदी आयपीएस दर्जाचे अधिकारी असणारे संजय वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाविकास आघाडी आणि अन्य पक्षांच्या तक्रारीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ल यांना पदावरून हटवले होते. त्यानंतर विवेक फळसणकर यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. आता मात्र संजय वर्मा हे राज्याचे नवीन पोलीस महासंचालक असणार आहेत.
केंद्रीय निवडणूक आयोगाने कॉँग्रेस आणि अन्य पक्षांच्या तक्रारीनंतर रश्मी शुक्ल यांना डिजीपी पदावरून हटवले होते. त्यानंतर राज्याच्या मुख्य सचिवांनी तीन नावे निवडणूक आयोगाकडे पाठवण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार रितेश कुमार, संजय वर्मा, विवेक फळसणकर ही तीन नावे देण्यात आली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने संजय वर्मा यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती केली आहे.
काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी यापूर्वी निवडणूक आयोगाला पत्र लिहून डीजीपी रश्मी शुक्ला यांना हटवण्याची मागणी केली होती. पटोले यांनी त्यांच्या निःपक्षपातीपणावर प्रश्न उपस्थित केले होते. याचदरम्यान आता निवडणूक आयोगाकडून राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ल यांची बदली करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत, मात्र पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या बदलीबाबत काँग्रेसकडून अडथळे निर्माण केले जात आहेत. 20 नोव्हेंबरपूर्वी त्यांची बदली करण्याची विनंती काँग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोगाला केली आहे. ते वादग्रस्त अधिकारी असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. रश्मी शुक्ला यांच्या बदलीसाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आयोगाला पत्रही पाठवले होते. जोपर्यंत ते या पदावर आहेत, तोपर्यंत राज्यात निष्पक्ष निवडणुका घेणे कठीण जाईल, असा गंभीर आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर आता त्यांची बदली होताना दिसत आहे.
विवेक फणसाळकर हे 1989 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी आत्तापर्यंत अनेक मोठमोठ्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या आहेत. काही महिन्यांपूर्वीच मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी त्यांची नेमणूक झाली आहे. त्यापूर्वी ते महाराष्ट्र पोलिस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाचे संचालक होते. ठाणे पोलिस आयुक्तपदावरुन मे 2021 मध्ये त्यांची या ठिकाणी बदली झाली. याशिवाय, 2016-18 या कालावधीत फणसळकर यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अतिरिक्त पोलिस महासंचालक म्हणून पदभार सांभाळला होता. संवेदनशील समजल्या जाणाऱ्या दहशतवाद विरोधी पथकाचेही ते प्रमुख होते.