सातारा : कोडोली येथील अमरलक्ष्मी परिसरात दोन महिलांमध्ये झालेल्या जोरदार हाणामारीची घटना परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे. या वादादरम्यान एका महिलेने थेट दुसऱ्या महिलेचा चावा घेतल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. ही घटना दि. २६ डिसेंबर रोजी घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, किरकोळ कारणावरून दोन्ही महिलांमध्ये आधी शाब्दिक वाद झाला. हा वाद काही वेळातच हातघाईपर्यंत पोहोचला. हाणामारी इतकी तीव्र झाली की, एका महिलेने रागाच्या भरात दुसऱ्या महिलेचा चावा घेतला. घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. या प्रकरणी संबंधित महिलेविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.