सातारा : अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी सातारा शहर सह तालुका पोलिसांनी तीन जणांवर कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 31 रोजी नारायण शिवाजी गोळे राहणार मालगाव तालुका सातारा हे तेथीलच एका चिंचेच्या झाडाच्या आडोशास दारू विक्री करताना आढळून आले. त्यांच्याकडून 840 रुपये किंमतीच्या देशी दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.
दुसऱ्या घटनेत, सातारा शहरातील एमआयडीसी येथील हिंदुस्तान कंपनीच्या समोर असलेल्या पत्र्याचे शेडच्या आडोशास संतोष शिवाजी पवार रा. दत्तनगर, कोडोली हे दारू विक्री करताना आढळून आले. त्यांच्याकडून सातशे रुपये किंमतीच्या देशी दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आले आहेत.
तिसऱ्या घटनेत, पारंगे चौक ते सिव्हिल हॉस्पिटल रस्त्यावर निर्मल लॉस च्या समोर राजू बाबुराव यादव रा. कामाठीपुरा, गोडोली, सातारा हे दारू विक्री करताना आढळून आले. त्यांच्याकडून 630 रुपये किंमतीच्या देशी दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.